एक्स्प्लोर
EPFO : ईपीएफओकडून 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, 'चार' कारणांसाठी 1 लाख रुपयांपर्यतचा क्लेम 3 दिवसात सेटल करणार
EPFO Claim Approval : पीएफ खातेदारांसाठी ईपीएफओनं मोठा निर्णय घेतला आहे. पीएफ खातेदारांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
'या' चार कारणांचे क्लेम तीन दिवसांत सेटल होणार
1/5

ईपीएफओच्या 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या व्याज दराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानं 8. 35 टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. त्यामुळं पीएफ खातेदारांच्या खात्यात 8. 25 टक्क्यांप्रमाणं व्याज जमा केलं जाईल.
2/5

पीएफ खातेदारांना विविध आर्थिक कारणांमुळं पीएफ खात्यातून पैसे काढले जातात. आजारपण, शिक्षण, घर खरेदी आणि लग्न या कारणांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे दावे तातडीनं मंजूर केले जाणार आहेत.
3/5

ईपीएफओनं दिलेल्या माहितीनुसार या कारणांसाठी केले जाणारे दावे तीन दिवसात मंजूर केले जाणार आहेत. त्यामुळं एखाद्या पीएफ खातेदाराला वरील कारणांसाठी पैसे आवश्यक असल्यास 3 दिवसात क्लेम मंजूर केले जाणार आहेत.
4/5

हे क्लेम ऑटोमेटिक, वेगवान आणि कोणत्याही त्रासाशिवाय मंजूर केले जाणार आहेत. ज्या पीएफ खातेदारांची केवायसी अपडेट असेल त्यांना क्लेम दाखल करताना चेकबुक किंवा पासबूकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही.
5/5

ईपीएफओकडून आजारपणाच्या कारणासाठी कर्मचाऱ्यानं जितकी रक्कम जमा केली असेल त्यातील ठराविक रक्कम पीएफ अॅडव्हान्स म्हणून काढता येऊ शकते. याशिवाय घर खरेदीसाठी सेवा पाच वर्ष पूर्ण असणं आवश्यक असतं. तर, लग्न करायचं असल्यास किमान 84 महिने म्हणजेच 7 वर्षांची सेवा पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. याशिवाय यूए्एन क्रमांक सक्रिय केलेला असणं आवश्यक आहे.
Published at : 27 May 2025 07:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























