एक्स्प्लोर
In Pics : पुढील महिन्यात 'या' बहुप्रतिक्षित गाड्या होणार लॉन्च, पाहा फीचर्स
WhatsApp_Image_2021-08-28_at_1125.33_PM_(1)
1/5

सप्टेंबर महिना ऑटो मार्केटसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कार भारतात लॉन्च करणार आहेत. यामध्ये फोक्सवॅगनची (Volkswagen) बहुप्रतिक्षित तैगुन (Taigun) ते एमजीची (MG) एस्टर (Astor) बाजारात आणली जाईल. सणासुदीपूर्वी या गाड्या लॉन्च होणार आहेत, ग्राहकही या गाड्यांची प्रतीक्षा करत आहे. लेटेस्ट फीचर्स व्यतिरिक्त, कंपन्या त्यांना मजबूत इंजिनसह लॉन्च करतील.
2/5

फोक्सवॅगन तैगुन (Volkswagen Taigun) : जर्मन ऑटो ब्रँड फोक्सवॅगनची बहुप्रतिक्षित तैगुन गाडीही सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात दाखल होईल. केबिनला ड्युअल टोन ब्लॅक आणि ग्रे कलर आणि सेंटर स्टेजवर 10-इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. तैगुनमध्ये हवेशीर फ्रंट सीट, इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी हेडलॅम्प, क्लायमेट कंट्रोल टाइप-सी यूएसबी पोर्ट देखील आहे. एसयूव्हीला स्टोरेज पॉकेट्स, सेंट्रल आर्मरेस्ट आणि टू-टोन फॅब्रिक आणि फॉक्स लेदर अपहोल्स्ट्री देखील मिळते. तैगुन दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 1-लिटर TSI आणि 1.5-लिटर TSI सह येईल. 113 बीएचपी आणि 175 एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी तयार केले गेले आहे. दुसरा इंजिन पर्याय 1.5 लिटर 4-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि ते जास्तीत जास्त 150 PS आणि 250 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. दोन्ही इंजिनांसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 1.0-लिटर युनिटसाठी टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DSG सह उपलब्ध असेल. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते.
Published at : 29 Aug 2021 11:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड























