एक्स्प्लोर
ATM Withdrawal : एटीएममधून पैसे निघाले नाहीत पण खात्यातून रक्कम कापली गेली? अशी मिळवा तुमची रक्कम
ATM Withdrawal Rules: काही वेळेस एटीएममधून पैसे काढताना बँक खात्यातून रक्कम कापली जाते. पण, रक्कम मिळत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काय करावे?

ATM Withdrawal : एटीएममधून पैसे निघाले नाहीत पण खात्यातून रक्कम कापली गेली? अशी मिळवा तुमची रक्कम
1/10

एटीएममधून अनेक वेळा रोख रक्कम काढताना खात्यातून पैसे कापले जातात, परंतु पैसे मिळत नाही. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पैसे मिळत नाही.
2/10

अशा परिस्थितीत अनेकदा ग्राहकाला मनस्ताप होतो आणि पैसे कापले गेल्याने तो चिंतेत राहतो.
3/10

तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर आरबीआयचे अशा प्रकरणांबाबत काही नियम आहेत, हे कायम लक्ष असू द्या.
4/10

आरबीआयनुसार, जर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील आणि एटीएममधून पैसे निघाले नसतील तर, अशा परिस्थितीत बँककडून पुढील पाच दिवसांत तुमचे कापलेले पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील.
5/10

पुढील पाच दिवसांत बँकेने डेबिट केलेले पैसे परत न केल्यास अशा परिस्थितीत ग्राहकाला दररोज 100 रुपये दंड अतिरिक्त द्यावे लागतील.
6/10

यासोबतच आरबीआयने ग्राहकांना सल्लाही दिला आहे की, जर त्यांच्या खात्यातून चुकीच्या पद्धतीने पैसे कापले गेले असतील तर काळजी करू नका.
7/10

अशा वेळी सर्व प्रथम तुम्ही तुमच्या या व्हवहाराची बँकेला माहिती द्या. यासोबतच तुमच्या एटीएम व्यवहारांची पावती जपून ठेवा.
8/10

तक्रार दाखल करूनही बँक पैसे परत करत नसेल तर तुम्ही बँकेच्या अंतर्गत लोकपालाकडे तुमची तक्रार करू शकता.
9/10

तुम्ही येथे झालेल्या सुनावणीत समाधानी नसल्यास, तुम्ही RBI च्या ग्राहक निवारण यंत्रणेकडे जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता.
10/10

याशिवाय, तुम्हाला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार करण्याचा पर्यायही आहे.
Published at : 16 Oct 2023 09:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
आयपीएल
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
