भूमिका चावला : भूमिकाने सलमान खानसोबत चित्रपट 'तेरे नाम'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. परंतु, या चित्रपटानंतर भूमिकाचा इतर कोणताही चित्रपट बॉक्सऑफिसवर कमाई करू शकला नाही. शेवटी भूमिका चावला सुशांत सिंह राजपूतच्या 'एमएस धोनी' या चित्रपटात धोनीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसून आली होती.
2/5
तनुश्री दत्ता : मी टू मुव्हमेंटनंतर चर्चेत असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने चित्रपट 'आशिक बनाया आपने' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतरही तनुश्रीला आपल्या करियरमध्ये फार संघर्ष करावा लागला होता.
3/5
राहुल रॉय : पहिला चित्रपट 'आशिकी'मधून एका रात्रीत स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय देखील बॉलिवूडमध्ये आपला जम बसवू शकला नाही. पहिल्या चित्रपटाने यश मिळवल्यानंतर त्याला फारस यश मिळवता आलं नाही.
4/5
प्राची देसाई : 'कसम से' या टेलिव्हिजन सीरीयलमधील आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री प्राची देसाईने चित्रपट 'रॉक ऑन', 'वन्स अपॉन ए टाईम इन मुम्बई' आणि 'बोल बच्चन' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले परंतु, तरिही प्राची बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवू शकली नाही.
5/5
ग्रेसी सिंह : 'लगान' आणि मुन्ना भाई एमबीबीएस' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसून आलेली अभिनेत्री ग्रेसी सिंह देखील सध्या बॉलिवूड चित्रपटांपासून दूर गेली आहे. सध्या ग्रेसी सिंह टेलिव्हिजनवरील 'संतोषी माता'ची भूमिका साकारत आहे.