एक्स्प्लोर
Shukra Gochar : आज शुक्राचा धनु राशीत प्रवेश; 'या' 6 राशींना लागणार चार चॉंद, अपेक्षित फळ लवकरच मिळणार
Shukra Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, भौतिक सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह शुक्राचं राशी परिवर्तन आज म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुपारी 3 वाजून 39 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे.
Shukra Gochar
1/14

2 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 05 मिनिटांपर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे. यामुळे सहा राशींच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते पाहूयात.
2/14

शुक्राच्या संक्रमणाने मिथुन राशीच्या लोकांची लव्ह लाईफ चांगली असणार आहे. तुम्हाला जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
3/14

तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
4/14

शुक्राचं राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी चांगलं ठरणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल.
5/14

तुम्हाला लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात सुख-शांती टिकून राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
6/14

शुक्र ग्रहाचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्ही प्रॉपर्टी, शेअरमध्ये गुंतवणूक करु शकता.
7/14

तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांना कामातून चांगला नफा मिळेल.
8/14

शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने धनु राशीच्या लोकांवर याचा शुभ प्रभाव होणार आहे. या काळात तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत असेल.
9/14

तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्याने तुम्हाला चिंता करण्याची गरज आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. एकंदरीत तुम्ही प्रसन्न असाल.
10/14

शुक्राच्या राशी परिवर्तनाने मकर राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. तुमच्या करिअरला चांगला वेग लागेल. तसेच, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल.
11/14

विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा असणार आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल.
12/14

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी असणार आहे. तुमच्या यशात आणि किर्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या मनातीसल इच्छा पूर्ण होईल.
13/14

तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आरोग्य देखील उत्तम राहील.
14/14

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 07 Nov 2024 09:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
भारत
























