एक्स्प्लोर
Shani Gochar : 2025 मध्ये 'या' 3 राशींची सूत्र बदलणार; शनीच्या संक्रमणाने जुळून येणार प्रमोशनचे योग
Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. मार्च 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या काळात कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

Shani Gochar 2025
1/6

सनातन धर्मानुसार, न्यायफळदाता शनीची शनिवारच्या दिवशी पूजा केली जाते. शनीची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, करिअरमध्ये देखील चांगलं यश मिळते.
2/6

मार्च 2025 मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. यामध्ये काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव दिसून येईल.
3/6

कर्क रास - कर्क राशीतील लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या दरम्यान तुमच्या समोर येणारी संकटं संपतील. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल. तसेच, धनलाभाचे संकेत आहेत.
4/6

वृश्चिक रास - वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, कुटुंबात सुख-शांती राहील.
5/6

मकर रास - मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून सुटका होईल. तसेच,तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल. नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा काळ सर्वात चांगला आहे.
6/6

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 09 Dec 2024 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
