एक्स्प्लोर
Rahu 2024 : राहू 'या' राशींवर पडणार भारी; येता काळ संघर्षाचा, वर्षभर अडचणी संपता संपणार नाही
Rahu Gochar 2024 : राहू सध्या मीन राशीत विराजमान आहे आणि 2025 पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. हा काळ अनेक राशींसाठी कठीण असेल, या काळात अनेक राशींना अडचणींचा सामना करावा लागेल.
Rahu Gochar 2024
1/8

राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हणतात आणि त्यांच्या वाईट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनाच अनेक अडचणी येतात. त्यात राहू 2025 पर्यंत मीन राशीत राहणार आहे, या दरम्यान त्याचे नक्षत्र परिवर्तन देखील होईल, जे काही राशींसाठी घातक ठरेल.
2/8

राहूचं नक्षत्र परिवर्तन 3 राशीच्या लोकांसाठी धोक्याचं ठरण्याची शक्यता आहे. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया
3/8

धनु रास : राहु तुमच्या सुखसोयी कमी करू शकतो. तुमचं आरोग्यही या काळात बिघडू शकतं, यावेळी तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा. येत्या काळात तुमचा खर्च खूप वाढू शकतो.
4/8

धनु राशीच्या लोकांच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकतं, तुम्हाला मोठ्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो, ज्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. मालमत्तेशी संबंधित वाद निर्णाण होऊ शकतात. यावेळी प्रवास करताना काळजी घ्यावी.
5/8

तूळ रास : तूळ राशीच्या लोकांच्या मनावर अनेक नकारात्मक विचारांचं वर्चस्व असू शकतं. तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या कामात अनेक अडथळे येऊ शकतात.
6/8

तूळ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडणं वाढू शकतात, तुमच्या नात्यात अंतर येऊ शकतं. राहूमुळे तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते.
7/8

कर्क रास : कर्क राशीच्या लोकांना येत्या काळात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल घडण्याची चिन्हं आहेत, जे तुमच्यासाठी चांगले ठरणार नाही.
8/8

राहू 8 जुलैला नक्षत्र बदलेल, या नंतरच्या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं. येत्या काळात तुमच्या आयुष्यात आव्हानं आणि अडथळे वाढू शकतात. तुम्ही जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा, या काळात तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.
Published at : 25 Aug 2024 09:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























