एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2024 : पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
Ganesh Chaturthi 2024 : ॠषीपंचमीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सभामंडपात गणपतीसमोर महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण करायला सुरुवात केली.
Ganesh Chaturthi 2024
1/7

ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल 35 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले.
2/7

ॠषीपंचमीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सभामंडपात गणपतीसमोर महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण करायला सुरुवात केली.
3/7

यावेळी हजारो महिलांचा जनसमुदाय अथर्वशीर्ष पठणासाठी पाहायला मिळाला.
4/7

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा च्यावतीने उत्सवाच्या 132 व्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
5/7

ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिलांनी अथर्वशीर्ष पठण सुरु केले. त्यापूर्वी महिलांनी शंख नाद केला.
6/7

या जनसमुदयानं एका स्वरात एका तालात अथर्वशीर्ष पठण केलं. यावेळी सर्व महिला पारंपरिक पोषाख, जरीची साडी परिधान करुन आल्या होत्या.
7/7

यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृशाली शिंदे यादेखील सभामंडपात उपस्थित होत्या.
Published at : 08 Sep 2024 08:15 AM (IST)
आणखी पाहा























