एक्स्प्लोर
Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीनिमित्त मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Dhanteras 2024 Wishes : यंदाच्या दिवाळीला आणि धनत्रयोदशीला आपल्या प्रियजनांना काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर काही शुभेच्छा संदेश या ठिकाणी पाठवल्या आहेत.
Dhanteras 2024 Wishes
1/10

धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
2/10

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा...!
3/10

आनंदाचा प्रकाश तुमचे जीवन उजळून टाको आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने समृद्धी आणि यश मिळो. धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा...!
4/10

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
5/10

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी कंदील, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
6/10

दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी घरी नांदू दे सुख समृद्धी… धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा...!
7/10

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10

धन धान्याची व्हावी घरीदारी रास राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10

आला आला दिवाळीचा सण घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Oct 2024 11:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















