एक्स्प्लोर
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला जुळून येतोय अद्भूत संयोग; 'या' 3 राशींना लागणार 'जॅकपॉट'
Dhanteras 2024 : यंदा 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ संयोग जुळून आला आहे. यामुळे काही राशींची तिजोरी फुल भरणार आहे. त्यामुळे काही राशी मालामाल होतील. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
Dhanteras 2024
1/7

धनत्रयोदशीच्या दिवशी यंदा त्रिग्रही योग, त्रिपुष्कर योग , इंद्र योग आणि लक्ष्मी नारायण योगाचा महासंयोग जुळून येणार आहे. हे सर्व धन प्रदान करण्याचे योग मानले जातात.
2/7

वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांसाठी यावर्षी धनत्रयोदशीचा मुहूर्त चांगला असणार आहे. या काळात प्रमोशनचे योह जुळून येणार आहेत. तसेच, पार्टनरशिपमध्ये तुम्हाला जोडीदाराचं चांगलं सहकार्य मिळेल.
3/7

वृश्चिक रास - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक चांगल्या डील्स मिळू शकतात. यामुळे तुम्हाला नवीन ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळेल. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करु शकता. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल.
4/7

कर्क रास - कर्क राशीच्या लोकांसाठी या दिवशी जुळून येणारे योग फार शुभ मानले जाणार आहेत. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, कुटुंबातील वातावरण चांगले असेल. या काळात लग्जरी वस्तू खरेदी करू शकता.
5/7

मीन रास - धनत्रयोदशीच्या दिवशी जुळून येणारा दुर्लभ संयोग मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
6/7

सिंह रास - सिंह राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त शुभ असणार आहे. या काळात तुमची कमाई चांगली होईल. तुमच्या करिअरचा कल वाढलेला दिसेल. जोडीदाराबरोबर तुमचं नातं चांगलं राहील.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 27 Oct 2024 09:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























