ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024
परभणीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा...सत्ताधारी आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी...
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर धनंजय मुडेंना रस्त्यावर फिरु देणार नाही, मनोज जरांगेंचा थेट इशारा...संपूर्ण घटनेचा खरा सूत्रधार धनंजय मुंडेच, भाजपच्या नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप...
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडीओ आकाच्या आकाने बघितला तर तुमचीही जेलवारी नक्की, परभणीत भाजप आमदार सुरेश धस यांचा इशारा...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर करणार, दोन्ही आरोपींची केज उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय चाचणी
देशमुख हत्या प्रकरणात डॉ. संभाजी वायभसे, वकील पत्नीसह आणखी एकजण एसआयटीच्या ताब्यात, रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी, वायभसेनेच सुदर्शन घुलेचा ठावठिकाणा दिल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, तर पकडलेले मुख्य आरोपी हे नसल्याचा सुरेश धस यांचा आरोप...
पराभवाबाबत नाराज होतो, नाराज आहे, भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या, राजन साळवींची मातोश्रीवारीनंतर प्रतिक्रिया
छत्तीसगडमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले पत्रकार मुकेश चंद्राकार यांची हत्या, ठेकेदारानं हत्या केल्याचं उघड, आतापर्यंत चार जणांना अटक
उमरेडच्या जंगलात वाघीण आणि तिच्या बछड्यांना घेरल्याप्रकरणी जिप्सीचालक आणि गाईड्सवर निलंबनाची कारवाई, वन्यप्रेमींनी व्यक्त केला होता संताप...
अयोध्येनंतर आता ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये उभारणार भव्य राम मंदिर, तब्बल दीडशे एकर जागेवर ७२१ फूट उंचीचं जगातलं सर्वात मोठं राम मंदिर असणार
पाचव्या कसोटीत ऋषभ पंतचे २९ चेंडूंमध्येच आक्रमक अर्धशतक, पण भारताच्या दुसऱ्या डावात दिवसअखेर ६ बाद १४१ धावा..