एक्स्प्लोर
Jyotirlinga Astrology Lunar Zodiac Sign : तुमच्या राशीनुसार 'या' ज्योतिर्लिंगाचं दर्शन शुभ, संकटातून मिळेल मुक्ती
Jyotirlinga Astrology Lunar Zodiac Sign : राशीनुसार या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात वाचा.
Jyotirlinga Astrology Lunar Zodiac Sign
1/13

हिंदू धर्मशास्त्रानुसार, भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगामध्ये भगवान शंकर स्वयं प्रकट झाल्याची मान्यता आहे. राशीनुसार या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने जीवनातील अडचणी कमी होतात असं मानलं जातं. त्यानुसार कोणकोणत्या राशींसाठी कोणतं ज्योतिर्लिंग शुभ आहे ते जाणून घेऊयात.
2/13

मेष रास - मेष राशीच्या लोकांनी तामिळनाडू येथील रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं दर्शन करावं. या ठिकाणी दर्शन घेतल्यास तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील.
3/13

वृषभ राशीच्या लोकांनी गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंगाला जाऊन दर्शन घ्यावे. हे दर्शन तुमच्यासाठी शुभ मानले जाते.
4/13

मिथुन राशीच्या व्यक्तींनी गुजरातमधील नागेश्वर ज्योतिर्लिंग पाहणं उत्तम ठरू शकतं. हे ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये स्थित आहे.
5/13

कर्क राशीच्या लोकांनी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे कारण हे दर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.
6/13

सिंह राशीच्या लोकांनी झारखंडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग भेट देणे चांगलं मानलं जातं.
7/13

जर कन्या राशीच्या लोकांनी आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला जाऊन दर्शन घेतलं तर त्यांना चांगलं फळ मिळू शकतं.
8/13

तूळ राशीच्या व्यक्तींनी उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे कारण हे दर्शन त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.
9/13

वृश्चिक राशीच्या लोकांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट द्यावी. हे दर्शन शुभ मानलं जातं.
10/13

धनु राशीच्या लोकांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे. हे त्यांच्या भाग्यासाठी चांगलं आहे.
11/13

मकर राशीच्या लोकांनी महाराष्ट्रातील भिमाशंकर ज्योतिर्लिंगाला जाणे उत्तम असते.
12/13

कुंभ राशीच्या लोकांनी उत्तराखंडातील केदारनाथ ज्योतिर्लिंग पाहावे. हे दर्शन तुमच्या अडचणी कमी करण्यास मदत करू शकते.
13/13

मीन राशीच्या लोकांनी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणं शुभ मानले जाते.
Published at : 15 Nov 2025 03:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























