एक्स्प्लोर
Rose : व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाचा गंध वाढला
व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाच्या फुलांना (Rose) मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे.
Rose Price
1/8

सध्या बाजारात गुलाबांच्या फुलांचे दर वाढले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
2/8

व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाच्या फुलांच्या (Rose) मागणीत मोठी वाढ झाली आहे.
3/8

व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या मागणी वाढल्यामुळं गुलाबाच्या किंमतीत (Rose Price) मोठी वाढ झाली आहे.
4/8

व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाची फुले देण्याची प्रथा आहे. गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जाते. सध्या गुलाबाला मागणी वाढली आहे. त्यामुळं दरातही मोठी वाढ झाली आहे.
5/8

गुलाबाची शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. फुलांची मागणी वाढल्यानं त्याचा थेट फायदा फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे.
6/8

देशातील विविध बाजारपेठांमध्ये गुलाबाच्या फुलांचे दर वाढले आहेत. सध्या 8 ते 10 रुपयांना विकले जाणारे गुलाबाचे फुल 40 ते 50 रुपयांना विकले जात आहे.
7/8

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बाजारपेठेत 70 टक्के फुलांची निर्यात बंगळुरू आणि नागपूरमधून होते. पांढऱ्या, पिवळ्या, फॅमिलिया, केशरी रंगाचे गुलाब तसेच जरबेराची फुलेही येथून येतात.
8/8

फुलांची आवक जास्त आणि विक्री कमी असेल तर भाव खाली येतात. तर आवक कमी आणि मागणी वाढली की फुलांच्या दरातही वाढ होते. याचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
Published at : 10 Feb 2023 08:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
