एक्स्प्लोर
Bail Pola 2022 : महाराष्ट्रात ठिकठिकाणी बैलपोळा उत्साहात साजरा
Bail Pola 2022 : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बैलपोळ्याचा (Bail Pola 2022) सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
Bail Pola 2022
1/4

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या नागदरा गावात पोळा हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी गावातील सर्वच बैल सजविण्यात आले. सजविलेल्या बैलांना वाजत-गाजत गावातील महादेवाच्या मंदिरासमोर एकत्र आणण्यात आले. त्या ठिकाणी बैलांटं सामूहिक पूजन करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या. गेल्या 12 वर्षांपासून ही परंपरा चालत असल्याने या ठिकाणच्या बैलांनी स्वत:हूनच मंदिराला प्रदक्षिणा घातली. विशेष म्हणजे पंचक्रोशीतील लोक हा बैलपोळा बघायला नागदरा या गावी येतात.
2/4

नांदेड जिल्ह्यात या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Published at : 26 Aug 2022 09:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























