एक्स्प्लोर

Yavatmal News : 'तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला' म्हणत धाकट्या भावाने मोठ्या भावाला संपवलं, यवतमाळमधील धक्कादायक घटना

यवतमाळ : घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

यवतमाळ : घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाने दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडली आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या झटाळा गावात गुरुवारी (17 ऑगस्ट) सकाळी हत्येची घटना घडली. शालीक खेत्रू मसराम (वय 50 वर्षे) असं मृताचं नाव आहे. तर मारोती खेत्रु मसराम (वय 42 वर्षे) असं आरोपी लहान भावाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन वाद

मृत शालिक मसराम व मारोती मसराम या दोघांचा वाद सुरु झाला. आरोपीची पत्नी माहेरी गेली होती. ती नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन दोन भावांमध्ये वाद झाला. "तुझ्यामुळे माझी पत्नी घर सोडून गेली, माझा परिवार तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तूच कारणीभूत आहेस," असं म्हणत दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी मारोतीने शालीकच्या डोक्यात दगडाने वार केला यात तो जागीच कोसळला. तर मारोती घराबाहेर निघून गेला. हा प्रकार पाहून गावकऱ्यांनी जखमी शालीकला उपचारांसाठी घाटंजी रुग्णालयात नेतं. परंतु तिथे तपासणी करुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरणी मृत शालीक मसरामच्या पत्नीने पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरता रुग्णालयात पाठवला. तर मारेकरी मारोती मसरामविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. घाटंजी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

दोन चिमुकल्यांना विष पाजून आईनेही आयुष्य संपवलं

दुसरीकडे चार दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील निंगणूर इथे आईने आपल्या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वतःचंही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे खळबळ उडाली होती. रेश्मा नितीन मुडे (वय २६ वर्षे), श्रावणी नितीन मुडे (वय ६ वर्षे) आणि सार्थक नितीन मुडे (वय ३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (14 ऑगस्ट) संध्याकाळी सहाच्या सुमारास रेश्मा मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजलं आणि त्यानंतर स्वतः विष प्राशन करुन आयुष्य संपवलं. माहेरातून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने छळाला कंटाळून रेश्मा मुडे यांनी आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. 

हेही वाचा

Yavatmal Crime News: आधी पत्नीची हत्या मग पतीचे अपहरण, यवतमाळच्या पुसदमधील धक्कादायक घटना समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
खासदार संजय देशमुखांच्या कारला अपघात, सुदैवाने बचावले, टिप्परच्या धडकेत वाहनाचं मोठं नुकसान
खासदार महोदयांच्या कारला अपघात, टिप्परच्या धडकेत वाहनाचं मोठं नुकसान; सुदैवाने बचावले संजय देशमुख
ATS Action: उच्चशिक्षितांभोवती दहशतवाद्यांचं जाळं, ATSच्या छापेमारीत मोठं दहशतवादी कनेक्शन उघड; अहिल्यानगरसह यवतमाळमधील छाप्याची संभाव्य कारणं काय?
उच्चशिक्षितांभोवती दहशतवाद्यांचं जाळं, ATSच्या छापेमारीत मोठं दहशतवादी कनेक्शन उघड; अहिल्यानगरसह यवतमाळमधील छाप्याची संभाव्य कारणं काय?
Maharashtra ATS Action: फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचे ब्रेनवॉशिंग, युवकांना केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये धाडलं?; ATSच्या छापेमारी धक्कादायक वास्तव उघड
फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचे ब्रेनवॉशिंग, युवकांना केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये धाडलं?; ATSच्या छापेमारी धक्कादायक वास्तव उघड

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget