एक्स्प्लोर

Yavatmal Crime News: आधी पत्नीची हत्या मग पतीचे अपहरण, यवतमाळच्या पुसदमधील धक्कादायक घटना समोर

Yavatmal Crime News: यवतमाळच्या पुसदमध्ये पतीची हत्या करुन पत्नीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yavatmal Crime News:  यवतमाळच्या (Yavatmal) पुसद तालुक्यातील वसंतवाडी येथे एक धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. ऊस तोडीच्या पैशांच्या देवाण - घेवाणीवरुन एका महिलेच्या पतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावेळी त्या महिलेने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता चार ते पाच जणांनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. त्यानंतर त्या महिलेच्या पतीला घेऊन ते लोक पसार झाले. याप्रकणी त्या चार ते पाच जणांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यातमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं?

अनिता अनिता निरंजन राठोड वय वर्ष 37 असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. मृतक निरंजन राठोड हा मुकादम असून तो ऊसतोड मजूर उपलब्ध करुन देण्याचे काम करत होता. दरम्यान मराठवाड्यातील एका कारखानदाराने ऊस तोडीसाठी निरंजन राठोडला ऊस तोड मजूर पुरविण्याकरिता सांगितले होते. यासाठी त्या कारखानदाराने निरंजनला दोन वर्षांपूर्वी पाचे ते सहा लाख रुपये दिले असल्याची माहिती मिळत असल्याचं सांगितल आहे. परंतु निरंजन काही कारणास्तव मजूरांना पाठवू शकला नाही. त्यानंतर निरंजन याने घेतलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम कारखानदाराला परत देखील केली होती. 

त्यानंतर उर्वरित रक्कम परत देण्यासाठी निरंजन टाळाटाळ करत होता अशी माहिती खंडाळा पोलिसांनी दिली आहे. त्या कारखानदारांच्या चार ते पाच माणसांनी निरंजनचे घर गाठले. निरंजन आणि त्याची यवतमाळमधील पुसद तालुक्यातील वसंतवाडी या गावामध्ये राहत होते. हे चार ते पाच जण रात्री वसंतवाडी येथे पोहचले. पोहचल्यावर त्यांनी निरंजनला मारहणार करण्यास सुरुवात केली. हे लोक निरंजनला गाडीत घालून पसार होत असतानाच निरंजनची पत्नी त्यांच्या गाडीसमोर येऊन उभी राहिली. 

गाडी अडल्याने तिला गाडीने धक्का देण्यात आला. त्यानंतर तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यामुळे अनिता गंभीर जखमी झाली आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला. ते चार ते पाच जण   निरंजनला घेऊन  वाशिम मार्गे मेहकरकडे पसार झाले.तसेच या पसार झालेल्या लोकांना पकडण्यासाठी खंडाळा पोलिसांचे एक पथक तात्काळ रवाना झाल्याची माहिती  पोलीस निरीक्षक निलेश चावडीकर यांनी दिली आहे.

या पसार झालेल्या लोकांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. पण यामुळे यवतमाळमधील पुसदमध्ये एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस यासंदर्भात पुढील कारवाई काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा :

Chhatrapati Sambhaji Nagar : शेतीच्या वादातून वाद झाला, लहान भावाने केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा घात झाला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवादDevendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Embed widget