Yawatmal : पोहण्याचा हट्ट बेतला जीवावर; पाण्याचा अंदाज न आल्याने तीन युवकांना पाण्यात बूडून दुर्दैवी मृत्यू
यवतमाळचे तीन युवक दुचाकीने वांजरी येथे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले. शनिवार दुपारची ही घटना आहे. आज पहाटेपासून शोधमोहीम राबवली असता तिघांचे मृतदेह आढळले.
Yawatmal News : यवतमाळचे तीन युवक दुचाकीने वांजरी येथे गेले होते. वांजरी गावालगत खदाणी आहेत. त्या खदाणींमध्ये सध्या पाणी साचले आहे. पाणी पाहून युवकांना पाण्यात डुबण्याचा मोह झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले. शनिवार दुपारची ही घटना आहे. सुरूवातीस ते तिघेजण निवांत बसले होते. त्यानंतर पोहण्याचा मोह न आवरल्याने ते तिघे त्या पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्याखाली बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळले. त्यामुळे ग्रामस्थांना शंका आली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले. आज पहाटेपासून शोधमोहीम राबवली असता तिघांचे मृतदेह आढळले.
तिघांचे मृतदेह सापडले
याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तातडीने पोलीस कर्मचाऱ्याना वांजरीला रवाना केले. रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही. आज पहाटे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता तिन्ही तरुणाचे मृतदेह आढळून आले आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
अशी आहेत युवकांची नाव
वणी शहरातील तीन युवक दुचाकीने वांजरी येथे गेले होते. वांजरी गावालगत खदाणी आहेत. त्या खदाणींमध्ये सध्या पाणी साचले आहे. पाणी पाहून युवकांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले. आज पहाटे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता तिन्ही तरुणाचे मृतदेह आढळून आले आहे. आसीम अब्दुल सलाट शेख (वय 16), नुमान शेख सादिर शेख (वय 16) राहणार एकता नगर आणि प्रतीक संजय मडावी (वय 16) रा. प्रगतीनगर असे या तिन्ही युवकांची नाव आहेत. घटनेच्या दिवशी मोपेड दुचाकी क्रमांक MH-29-Y- 5342 वरुन तीन तरुण वांजरीला गेले होते.
पाऊसामुळे आजकाल अनेक घटना घडत आहेत. अनेकांना पाण्यात पोहण्याची आवड असते. त्यामुळे कोणताही विचार न करता कित्येकदा अनेकजण पोहायला जातात आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्युला सामोरे जावे लागते. त्यामुळे खात्रीशीर ठिकाण असेल, तरच पाण्यात उतरायला हवे. अन्यथा अशा दुर्घटना घडतात. युवकांमध्ये जोश असतो. पण, तो जोश योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
जालन्यात आजही मराठा समाज आक्रमक, आंदोलक तरुणानं स्वतःची दुचाकी पेटवली; व्हिडीओ व्हायरल