एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या वर्धा, यवतमाळ वाशिम आणि रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या बैठकीत नेमकं काय झालं ?

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज वर्धा, यवतमाळ वाशिम आणि रामटेक या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज वर्धा, यवतमाळ वाशिम आणि रामटेक या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीत नेमकं काय झाले? याबाबत सुत्रांनी माहिती दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात...

वर्धा लोकसभा मतदार संघाचा आढावा.. 

वर्धा लोकसभा मतदार संघांचा आढावा घेत असताना विधानसभा मतदार संघांची देखील माहिती घेतली. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची ताकद कशी आहे, याची स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. आपल्याला आघाडीमध्ये निवडणूका लढवायच्या आहेत त्यादृष्टीने आपली तयारी करा, जर विधानसभा किंवा लोकसभा मतदार संघात आपण जागा मागताना आपली तयारी असायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.  

जर लोकसभा मतदार संघ आपल्याकडे घ्यायचा असेल तर त्याठिकाणी आपल्या पक्षाची ताकद कशी आहे, आपला उमेदवार दिला तर निवडुन येऊ शकतो का? याविषयी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविकास आघडीमध्ये आपण मतदार संघावर दावा करत असताना त्या मतदार संघात आपली ताकद वाढवा, स्थानिक पातळीवरील संघटना मजबूत करा उद्धव ठाकरेंनी पदाधिकार्यांना आदेश दिलेत. 

भावना गवळी आणि विधानसभेत संजय राठोड यांना धडा शिकवा - 

आगामी लोकसभा निवडणुकीत भावना गवळी आणि विधानसभेत संजय राठोड यांना राजकीय धडा शिकवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.  आगामी यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आज झाली. वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघात आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करा, कुठल्याही परिस्थितीत आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. येणाऱ्या निवडणुकात भावना गवळी आणि संजय राठोड यांना धूळ चाखायला लावा, असेही सांगितले.   

रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा

उद्धव ठाकरे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. आपल्याला सोडून गेलेल्या खासदाराचा कुठल्याही परिस्थितीत पराभव करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीतील पदाधिकाऱ्यांना दिल्या. रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा हा आपला पक्ष लढवणार असून या लोकसभा मतदारसंघात आपला खासदार जरी पक्ष सोडून गेला, असला तरी सध्याची परिस्थिती पाहून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget