Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरातून 'टुकटूक राणी'ची एक्झिट; आज कोणाचा प्रवास थांबणार?
Yashashree Masurkar : बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील टुकटूक राणी अर्थात यशश्री मसुरकरचा प्रवास थांबला आहे.
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. चाहत्यांमध्ये आता या कार्यक्रमाची क्रेझ कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमात नव-नवे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दोन सदस्य आऊट होणार आहेत. त्यातील यशश्री मसुरकर (Yashashree Masurkar) ही घराबाहेर पडणारी पहिली सदस्य आहे.
आज कोण होणार आऊट?
यशश्रीबरोबर किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक डेंजर झोनमध्ये होते. त्यातून यशश्रीला घराबाहेर पडावं लागलं. अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी सेफ झाल्या. आता किरण माने आणि अमृता देशमुख यांच्यापैकी एक जण आऊट होणार आहे. रविवारी कोणता दुसरा सदस्य घराबाहेर पडणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
यशश्रीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास थांबल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. यशश्री आऊट झाल्यानंतर एकाही सदस्याला न भेटला घराबाहेर पडली आहे. महेश मांजरेकरांनी तिला न भेटण्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली,"घरातून बाहेर पडताना सदस्यांना भेटले असते तर खूप भावूक झाले असते. मला रडायचं नव्हतं त्यामुळे मी कोणाला न भेटता बाहेर पडले".
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर यशश्रीने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहे. तिने लिहिलं आहे,"तुमच्या सहकार्याबद्दल आभार... खूप खूप प्रेम". यशश्रीच्या या पोस्टवर छान खेळलीस, सर्वोत्कृष्ट स्पर्धक, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
यशश्री मसुरकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. 'टुकटूक राणी' म्हणून तिला ओळखले जाते. अभिनेत्री असण्यासोबत ती मॉडेलदेखील आहे. तिने हिंदी मालिकांमध्ये जास्त काम केलं आहे. ती एक उत्तम व्हॉइस आर्टिस्टदेखील आहे. 2016 साली तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
'बिग बॉस मराठी' टीआरपीच्या शर्यतीत मागे
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची चाहते प्रतीक्षा करत होते. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. दरवर्षी टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असणारा हा कार्यक्रम यंदा मात्र मागे पडला आहे. या कार्यक्रमाला 3.0 रेटिंग मिळाले आहे. तर वीकेंडच्या चावडीला 3.0 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या