एक्स्प्लोर

Year Ender 2017 : डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी ते उत्तर कोरियाची अण्वस्त्र चाचणी

2017 हे वर्ष जागतिक पाटलावर अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. यातील महत्त्वाचं आणि लक्ष्यवेधी ठरलं ते म्हणजे, उत्तर कोरियाची अवस्त्र चाचणी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा.

2017 हे वर्ष जागतिक पाटलावर अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. यातील महत्त्वाचं आणि लक्ष्यवेधी ठरलं ते म्हणजे, उत्तर कोरियाची अवस्त्र चाचणी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा. अमेरिकेच्या या घोषणेमुळे आखाती देशातील जखमेवरची खपली काढवी, तशीच ही घटना होती. अमेरिकेच्या या घोषणेमुळे आखाती देशातील सर्व मुस्लीम देशांसह सौदी अरेबियानेही अमेरिकेविरोधात दंड थोपाटले. त्यामुळे, अमेरिका विरुद्ध इस्लामिक देश हा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाची सूत्रं हाती घेतली. पण त्यांच्या या निवडीला जागतिक स्तरावर अतिशय कडवा विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, जगभरातील 20 लाखापेक्षा अधिक लोकांनी रस्त्यावर उतरुन, ट्रम्प यांचा निषेध व्यक्त केला. यात सर्वाधिक प्रमाण हे इस्लमिक देशातील होते. फेब्रुवारी महिन्यात महत्त्वाच्या घडामोडी नसल्या, तरी एक महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरली ती म्हणजे, ब्रिटेनमध्ये. ब्रिटेनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी आपली 65 वर्षांची कारकीर्द पूर्ण करत, देशातल्या पहिल्या महिला साम्राज्ञी होण्याचा मान मिळवला. त्यांनी आपल्या पणजी  महाराणी व्हिक्टोरीया यांचा शासक म्हणून विक्रम मोडित काढला. महाराणी व्हिक्टोरीया यांनी 39 वर्ष ब्रिटनच्या साम्राज्यावर अधिराज्य गाजवलं होतं. 2017  मधील मार्च महिना आर्थिक जगतासाठी अतिशय महत्त्वाचा महिना ठरला. कारण 10 मार्च रोजी संयुक्त राष्ट्राने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात जग हे 1945 नंतर सर्वात मोठ्या मानवीय संकटातून जात असल्याचं स्पष्ट केलं. यात नायझेरिया, सोमालिया, दक्षिण सुदान आणि येमेनमधील जवळपास दोन कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं सांगितलं. तर 29 मार्च रोजी ब्रिटेनने ‘लिस्बन’ करारा तरतुदीनुसार, यूरोपीयन संघातून बाहेर पडण्याच्या औपचारीक हालचाली सुरु केल्या. त्यामुळे जगभरातील अर्थ क्षेत्रावर हा मोठा आघात होता. याच महिन्यात आणखी  एक महत्त्वाची आणि लक्षवेधी घटना घडली, पण त्याची जास्त चर्चा झाली नाही. 26 मार्च रोजी कैरी लाम यांची हॉगकाँगच्या पहिल्या महिला मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पूर्वी हॉगकाँगमध्ये कोणत्याही महिलेची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती झाली नव्हती. एप्रिल महिन्याची सुरुवात नैसर्गिक आपत्तीने झाली. 1 एप्रिल रोजी कोलंबियाच्या मकोआ शहरात भूस्खलन झाल्याने तब्बल 250 जणांचा मृत्यू झाला. तर याच आठवड्यात  म्हणजे, 6 एप्रिल रोजी अमेरिकेने अफागाणिस्तानातील ISIS च्या अड्ड्यांवर जीबीयू-43 बॉम्ब टाकून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. महिन्याच्या मध्यभागी आणखी एक घटना घडली म्हणजे, 16 एप्रिल रोजी तुर्कस्तानचे पंतप्रधान रेसेप तईप एर्दोगन यांनी जनमत कौल जिंकून पुन्हा देशाची सूत्रं आपल्या हाती घेतली. मे महिना हा सायबर हल्ल्याने हादरून गेला. 12 मे रोजी जगातल्या जवळपास 100 देशांवर रॅन्समवेअर सायबर हल्ला झाला. त्यामुळे संपूर्ण जग एकप्रकारे ठप्प झाले होतं. अनेक कंपन्यांचे सॉफ्टवेअर बंद पडलं होतं. त्यामुळे कंपन्यांना कोट्यवधीचं नुकसान सहन करावं लागलं.  तर 14 मे रोजी ब्रिटेनच्या मॅन्चेस्टरमधील एका संगीत कार्यक्रमात आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यात 22 जणांचा मृत्यू झाला. या महिन्यात एक चांगली घटना घडली, ती म्हणजे, फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखपदी सर्वात तरुण व्यक्ती विराजमान झाली.  14 मे रोजी 39 वर्षीय एमॅनुएल मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रप्रमुख पदाची सूत्रं आपल्या हाती घेतली. जून महिन्यातही अतिशय महत्त्वाच्या आणि आतरराष्ट्रीय जगतावर दूरगामी परिणाम करणाऱ्या घटना घडल्या. 10 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. तर 21 जून रोजी ISIS च्या दहशतवाद्यांनी इराकच्या मोसूलमधील तब्बल 842 वर्ष जुनी ऐतिहासिक अल-नूरी मशीद बॉम्ब हल्ल्याद्वारे जमीनदोस्त केली. जुलै महिना पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा होता. करण 28 जुलै रोजी ‘पनामा पेपर्स’ घोटाळा प्रकरणी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे, पंतप्रधान नवाझ शरिफ यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. भ्रष्टाचाराच्या आरोपात एखाद्या पंतप्रधानाला पदावरुन पायउतार व्हावे लागणे ही पाकिस्तानमधील तशी पहिलीच घटना होती. तर दुसरीकडे अमेरिकेच्या निर्बंधामुळे नाराज झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 30 जुलै रोजी आपल्या देशातून 755 अमेरिकी राजदूतांची हकालपट्टी केली. जुलैच्या उलथापलथीनंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पाकिस्तानामध्ये पडद्या आडूनच्या राजकारणाचा नवा खेळ सुरु झाला.  ‘पनामा पेपर्स’ प्रकरणामुळे पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर, नवाज शरीफ यांचे निष्ठावान शाहिद खाकन अब्बासी यांनी 1 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची सूत्रं स्विकारली. त्यामुळे शरिफ यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले तरी, तेच आपल्या शिलेदाराच्या मदतीने देशाचा गाडा हाकत आहेत. ऑगस्टमध्ये जगाच्या चिंतत भर टाकणारी घटना घडली म्यानमारमध्ये. 25 ऑगस्ट रोजी म्यानमारमध्ये लष्करी कारवाईनंतर जवळपास 10 लाखापेक्षा अधिक अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमारमधून पलायन केले. यानंतर संपूर्ण जगभरात म्यानमारवर टीकेची झोड उठली. पलायन केलेल्या रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशचा आसरा घेतला, त्यामुळे बांगलादेशकडून म्यानमारवर लष्करी कारवाई थांबवून, रोहिंग्यांच्या मानवाधिकारांचं जतन करण्यासंदर्भात दबाव वाढू लागला. याच महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे, 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान अमेरिकेच्या ह्यूस्टन आणि पूर्व टेक्सासमध्ये हार्वे वादळाने थैमान घातलं होतं. या वादळाच्या तडाख्यात 90 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास 200 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. सप्टेंबर महिना आंतरराष्ट्रीय जगताला पुन्हा विश्वयुद्धाच्या खाईत ढकलतो की काय असा प्रश्न उपस्थित करणारा ठरला. कारण वारंवार समज देऊनही उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र परिक्षण घेतलं जात होतं. त्यामुळे 12 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने एकमताने उत्तर कोरियावर निर्बंध घातले. ही कारवाई उत्तर कोरियाने सहाव्यांदा अणवस्त्र परिक्षण घेतल्यानंतर काही दिवसातच करण्यात आली. याच महिन्यात कॅरेबियन बेटं नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडली. 6 आणि 18 सप्टेंबर रोजी इरमा आणि मारिया वादळाने कॅरेबियन बेटांचं मोठं नुकसान झालं. तर 7 आणि 19 सप्टेंबर रोजी दोन शक्तीशाली भूकंपाने मॅक्सिको हादरलं, यात जवळपास 470 पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात मृत्यूचे तांडवं पाहायला मिळालं. 1 ऑक्टोबर रोजी अमेरिकेच्या लास वेगासमध्ये एका संगीत कार्यक्रमात एका माथेफिरुने अंधाधुंद गोळीबार केला. यात 58 जणांचा मृत्यू झाला. तर 550 जण जखमी झाले. तर 14 ऑक्टोबर रोजी सोमालियाच्या मोगादिशूमध्ये एका ट्रकमध्ये बॉम्बस्फोट झाला. यात तब्बल 500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. तर  24 ऑक्टोबर रोजी चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं नाव आणि विचारधारा पक्षाच्या घटनेत समाविष्ट करुन, त्यांना पक्षाचे संस्थापक माओ आणि त्यांचे उत्तराधिकारी डेंग शियाओपिंग यांचा दर्जा देण्यात आला. 27 ऑक्टोबर रोजी कॅटलोनियाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर स्पेनने जनमताचा कौल घेऊन, हे स्वातंत्र्य देण्यास नकार दिला. नोव्हेंबरमध्ये आखाती देशात अतिशय महत्त्वापूर्ण घटना घडली.  5 नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेच्या अंतर्गत सौदी राजपूत्र आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करुन, सौदी राजे मोहम्मद बिन सलमान यांनी सत्तेवरील आपली पकड मजबूत बनवली. तर 12 नोव्हेंबर रोजी इराण-इराक सीमेवर भूकंपामुळे 600 पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला. 21 नोव्हेंबर रोजी झिम्बॉब्वेच्या लष्कराने 37 वर्षांपासून राष्ट्रपतीपदावर विराजमान असलेल्या रॉबर्ट मुगाबे यांना पदच्च्यूत करुन देशात लष्करी राजवट लागू केली. 29 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय निर्बंध झुगारुन उत्तर कोरियाने पुन्हा आपल्या अतिशय शक्तीशाली इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसायलचं परिक्षण केलं. वर्षाच्या अखेरीला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला. 4 डिसेंबर रोजी येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांची त्यांचेच माजी समर्थक असलेल्या हूती बंडखोरांनी हत्या केली. तर दुसरीकडे 9 डिसेंबर रोजी आपल्या देशातून आयसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगत, सिरीयासोबतची आपली सीमाही सुरक्षित केल्याचा दावा इराकने केला. याच महिन्यात आणखी एक घटना घडली ती म्हणजे, 6 डिसेंबर रोजी. कारण गेल्या अनेक दशकापासूनच्या आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करत, अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली. त्याला इस्लामिक देशांकडून तीव्र विरोध झाला. विशेष करुन, सौदीसारख्या देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.