World Teachers Day 2021 : आज साजरा केला जातोय जागतिक शिक्षक दिन, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
World Teachers Day 2021 : ज्या पद्धतीने भारतात 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातोय त्याच पद्धतीने आज जागतिक स्तरावर शिक्षक दिन साजरा केला जातोय.
World Teachers Day 2021 : आजचे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे भविष्य आहेत आणि या भविष्याला घडवण्याचे काम हे शिक्षक करतात. मनुष्याच्या आयुष्यातील शिक्षकाचे स्थान लक्षात घेऊन जगभरात दरवर्षी 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन (International Teachers Day) साजरा केला जातोय.
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचा इतिहास
शिक्षकांचे अधिकार, जबाबदारी, रोजगार आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्था या गोष्टींच्या संबंधित आराखडा तयार करण्यासाठी 1966 साली यूनेस्को आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांची एक बैठक पार पडली. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात यावा ही यूनेस्कोची शिफारस 1994 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर करण्यात आली. त्यानंतर जगभरात आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
On Tuesday's #WorldTeachersDay we pay tribute to the invaluable contribution of teachers to students, communities and societies.
— United Nations (@UN) October 5, 2021
It's vital that teachers are heard, supported & empowered. https://t.co/ghcdiXJxZo pic.twitter.com/yTSUQSwEUU
विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात असं मानलं जातं. पण या मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं महत्वपूर्ण काम हे शिक्षक करतात आणि त्यांनी केलेल्या या कामावरच देशाचं भविष्य ठरतं. शिक्षक विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यास मदत करतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांना एक जबाबदार आणि आदर्श नागरिक म्हणून कसं जगायचं, आयुष्यातील आव्हानांना कसं सामोरं जायचं याचं महत्वपूर्ण ज्ञान देतात. चांगला समाज घडवण्यात शिक्षकांचे योगदान लक्षात घेता त्यांचा सन्मान म्हणून जगभर शिक्षक दिन साजरा केला जातो.
जगभरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाची थीम ही 'Teachers: Leading In Crisis, Re-Imagining The Future' अशी ठेवण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय शिक्षक दिन हा यूनेस्को, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या वतीनं साजरा करण्यात येतो.
संबंधित बातम्या :