एक्स्प्लोर

World Photography Day 2023 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व

World Photography Day 2023 : हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं असा आहे.

World Photography Day 2023 : आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण पुन्हा फोटोंच्या माध्यमातून जिवंत करता येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात. आज जागतिक फोटोग्राफी दिन. प्रत्येक फोटोग्राफर साठी हा महत्वाचा दिवस. 19 ऑगस्ट रोजी हा दिवस हा साजरा केला जातो यामागची काही कारणं आहेत. हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं असा या दिनाचा उद्देश आहे.

जागतिक फोटोग्राफी दिनाचा इतिहास (World Photography Day History) : 

आजच्या युगात छायाचित्रकार फोटो काढण्यासाठी एकापेक्षा जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. माहितीनुसार जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरुवात तशी 2010 पासून झाली मात्र याचा इतिहास खूप जुना आहे. फ्रान्समधील जोसेफ नीसफोर निपसे (joseph Nicephore Niepce) आणि लुईस डॅगुएरे (Louis Daguerre) नावाच्या दोन व्यक्तिंनी ‘डॅगुएरोटाइप’ चा शोध लावून प्रथमच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली. फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने 9 जानेवारी 1837 रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. ही घोषणा झाल्यानंतर 10 दिवसांनी फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटंट खरेदी केले आणि ते जगाला भेट म्हणून दिले कॉपीराइट न ठेवता दिले.19 ऑगस्ट 1939 रोजी सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. म्हणून हा दिवस ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ म्हणजेच जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. 

1839 मध्ये विल्यम हेन्री (William Henry) फॉक्स टालाबॉटने छायाचित्र काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. टालाबॉट यांनी कागदावर आधारित मीठ प्रिंट वापरून एक अधिक अष्टपैलू छायाचित्रण प्रक्रिया शोध लावला. तसेच अमेरिकेचे फोटो प्रेमी रॉबर्ट कॉर्नेलियस (Robert Cornelius) यांना जगातील पहिले सेल्फी क्लिक करणारे व्यक्ती मानले जातात. त्यांनी  1839 मध्ये ही सेल्फी काढली होती.  

जागतिक छायाचित्रण दिनाचा उद्देश

जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्याचा उद्देश छायाचित्रण कलेचा प्रचार करणे हा आहे. त्यानिमित्त या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि छायाचित्र प्रदर्शनही आयोजित केले जाते. ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी क्लिक केलेली दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.

जागतिक छायाचित्रण दिनाची थीम 

देशभरात जागतिक छायाचित्रण दिन कार्यक्रमाची थीम आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी दरवर्षी एक थीम ठरवली जाते. या वर्षी जागतिक छायाचित्रण दिन 2023 साठी 'लँडस्केप' ही थीम निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Sambhaji Bhide on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
Prashant Koratkar: पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 News : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP MajhaKunal Kamra Eknath Shinde Controversy : कामराच्या विडंबनाला एकनाथ शिंदेंचं काय उत्तर? Special ReportUddhav Thackeray Special Report : विधानभवनाच्या दारात सरदेसाई-ठाकरेंमध्ये काय चर्चा?ABP Majha Marathi Headlines 6.30 AM Top Headlines 6.30 AM 27 March 2025 सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Sambhaji Bhide on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
Prashant Koratkar: पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
IPL 2025 RR Vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सचा कणा असलेल्या सुनील नरेनला 1628 दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर केलं, खरं कारण समोर आलं
कोलकाता नाईट रायडर्सचा कणा असलेल्या सुनील नरेनला 1628 दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर केलं, खरं कारण समोर आलं
Shani Gochar 2025 : 29 मार्चला शनी अमावस्या, 'या' 3 राशींनी राहावं अलर्ट; जाणून घ्या शनी अमावस्येचा 12 राशींवर होणारा परिणाम
29 मार्चला शनी अमावस्या, 'या' 3 राशींनी राहावं अलर्ट; जाणून घ्या शनी अमावस्येचा 12 राशींवर होणारा परिणाम
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
Embed widget