World Blood Donar Day 2022 : आज 'जागतिक रक्तदाता दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
World Blood Donar Day 2022 : जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आहे.
World Blood Donar Day 2022 : रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात येतो. रक्तासह जटिल वैद्यकीत आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेस समर्थन देता येते.
जागतिक रक्तदान दिनाचे महत्व :
जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आहे. हा दिवस ऐच्छिक, न चुकता रक्तदात्यांचे जीवन वाचवणाऱ्या भेटवस्तूंसाठी आभार मानण्याचा एक प्रसंग आहे.
जागतिक रक्तदान दिन 2022 ची थीम :
दरवर्षी जागतिक रक्तदान दिनानिमित्त वेगळी थीम ठेवली जाते. या वर्षाची थीम आहे…”रक्तदान हे एकतेचे कार्य आहे. प्रयत्नात सामील व्हा आणि जीव वाचवा.” या थीमचे उद्दिष्ट आहे की लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आणि समुदायांमध्ये लोकांना रक्तदान करण्यास जागृत करणे तसेच त्यांना या प्रक्रियेत सामील करून घेणे असा आहे.
जागतिक रक्तदान दिनाचा इतिहास :
जागतिक आरोग्य संघटनेने 2005 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकाराने 2005 मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा दिवस कार्ल लँडस्टेनरच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या :
- Kabir Jayanti 2022 : संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात...
- Vat Purnima 2022 : उद्या वटपौर्णिमेचा सण! धन्याच्या दिर्घायुष्यासाठी पूजेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व
- Important Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?