दिनेश गुणवर्धने असतील श्रीलंकेचे पुढील पंतप्रधान? राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या घोषणेची प्रतीक्षा
BMW India ने भारतात आपली स्पेशल एडिशन कार लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त देशात 5 सिरीज 50 Jahre M Edition लॉन्च केली आहे.
Sri Lanka Next PM: श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून रानिल विक्रमसिंघे यांनी 21 जुलै रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आता श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे खासदार दिनेश गुणवर्धने यांची देशाचे पुढील पंतप्रधान (Sri Lanka Next PM) म्हणून नियुक्ती करू शकता, अशी बातमी आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिनेश गुणवर्धने हे श्रीलंकेचे पुढील पंतप्रधान असू शकतात. राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सिन्हुआ या वृत्तसंस्थेला सांगितले की, विक्रमसिंघे गुरुवारीच नवीन पंतप्रधानाची नियुक्ती करतील आणि यासाठी गुणवर्धने यांचे नाव चर्चेत आहे.
रानिल विक्रमसिंघे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या सुरक्षेच्या बाबतीत आपले कर्तव्य बजावल्याबद्दल तिन्ही सशस्त्र दल आणि पोलिसांचे त्यांनी आभार मानले. श्रीलंकेच्या सर्वोच्च पदाची शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे शुक्रवारी त्यांचे नवीन मंत्रिमंडळही तयार करतील.
राजकीय सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे ज्येष्ठ संसद सदस्य दिनेश गुणवर्धन यांना आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचे पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त करतील. दिनेश गुणवर्धने हे उत्कृष्ट राजकारणी, कॅबिनेट मंत्री आणि श्रीलंकेचे संसद सदस्य आहेत. 2020 च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र संबंध मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, श्रीलंका अजूनही आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची आर्थिक स्थिती इतकी बिघडली आहे की, लोक रस्त्यावर उतरले असून तीव्र निषेध करत आहेत. गोटाबाया यांनी देश सोडून पळ काढला. त्यांच्याविरोधात जनक्षोभ आणि संतापाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता त्यांची राष्ट्रपतिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी:
Joe Biden Covid 19 Positive : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण, झूम कॉलद्वारे राहणार संपर्कात
Italy PM Resign : इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षाची अनुपस्थिती