एक्स्प्लोर

हवा प्रदूषणामुळे दरवर्षी सत्तर लाख लोकांचा मृत्यू; WHO नव्या गाईडलाईन्स जारी

Air Pollution : 2017 सालच्या तुलनेत 2024 पर्यंत देशातून PM 2.5 चे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे ध्येय भारतानं ठेवलं आहे.

मुंबई : हवा प्रदूषण ही एक घातक समस्या बनत चालली असून यामुळे जगभरात दरवर्षी सत्तर लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागतोय असं जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) स्पष्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सहा प्रमुख घातक प्रदूषकांच्या संबंधित नव्या गाईडलाईन्स जारी केल्या असून त्याचे पालन सर्व देशांनी करावं असं आवाहनही केलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने PM 2.5, PM 10, ओझोन, नायट्रोजन डाय ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि कार्बान मोनोक्साईड या सहा घातक समजल्या जाणाऱ्या प्रदूषकांच्या संबंधी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या आधी 2005 साली या प्रदूषकांच्या संबंधित मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती. आता त्याहून अधिक कडक मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे जगातील देशांना कायदेशीररित्या बंधनकारक नाहीत पण हवा प्रदूषणाच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडतील असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. 

हवा प्रदुषणामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी 80 टक्के मृत्यू हे PM 2.5 या प्रदूषकामुळे होतात. त्यामुळे हे प्रदूषक सर्वाधिक धोकादायक समजलं जातं. 

भारताने या आधी 2009 साली या प्रदूषकांच्या संबंधित जागतिक आरोग्य संघटनेच्या धर्तीवर मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. आता नवी मार्गदर्शक तत्वे ही पुढच्या वर्षी म्हणजे 2022 पर्यंत तयार केली जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2017 सालच्या तुलनेत 2024 पर्यंत देशातून PM 2.5 चे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे ध्येय भारतानं ठेवलं आहे. 

जगातल्या एकूण लोकसंख्येच्या 90 टक्के लोकसंख्या आणि दक्षिण आशियातील 100 टक्के लोकसंख्या ही हवा प्रदूषणयुक्त परिसरात वास्तव्य करते असं जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या अहवालात सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 06 OCT 2024 :  10 PMMarathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 6ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget