WHO confirms Marburg Disease Outbreak: चिंताजनक! कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू, 'मारबर्ग' व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू, WHO ने बोलावली महत्त्वाची बैठक
Marburg Virus Disease : कोरोनाचा संसर्ग कायम असताना आफ्रीकन देशांमध्ये नवीन व्हायरसने चिंता वाढवली आहे. घाना (Guinea) देशामध्ये 'मारबर्ग' विषाणू सापडला आहे.
WHO Meeting On Marburg Virus Outbreak : एकीकडे कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग कमी होताना दिसत नाहीय त्यातच आता आणखी नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. मध्य आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू (Marburg Virus) पसरत आहे. हा नवा विषाणू कोरोना व्हायरस आणि इबोला व्हायरसपेक्षाही धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. आफ्रीकेकडील देशांमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमुळे दहशत निर्माण झाली आहे.
मारबर्ग विषाणू कोरोना आणि इबोलापेक्षाही अधिक प्राणघातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. मारबर्ग विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान बैठक बोलावण्याआधी WHO च्या अधिकाऱ्यांनी या विषाणू संसर्गाच्या गंभीरतेबाबत चर्चा केली होती.
घानामध्ये नऊ जणांचा मृत्यू
आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू संसर्ग वाढताना दिसत आहे. घानामध्ये धोकादायक मारबर्ग व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती WHO (World Health Organization) ने दिली आहे.
Equatorial Guinea confirms outbreak of Marburg virus, nine persons dead: WHO
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2023
Read @ANI Story | https://t.co/iyU6iPol7i#EquatorialGuinea #MarburgVirus #WHO pic.twitter.com/7PaoAOTrPe
WHO confirms Marburg disease outbreak: येथे पहिल्यांदा आढळला 'मारबर्ग'
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सांगितलं की, मारबर्ग विषाणू रोग हा एक विषाणूजन्य रोग आहे. यामुळे ताप येतो आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. या विषाणू संसर्गाचा मृत्यू दर 88 टक्के इतका जास्त आहे. मारबर्ग विषाणू आणि इबोला विषाणू एकाच कुटुंबातील विषाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत. 1967 मध्ये जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्ट आणि सर्बियातील बेलग्रेड येथे या रोगाचा संसर्ग आढळून आला. जर्मनी आणि सर्बिया या दोन देशांमध्ये एकाच वेळी मारबर्ग विषाणूचा मोठा उद्रेक झाला.
WHO confirms Marburg disease outbreak: मारबर्ग विषाणू कुठून आणि कसा पसरला?
घानासोबतच अनेक मध्य आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडामधून आयात केलेल्या आफ्रिकन हिरव्या माकडांवर (Cercopithecus aethiops) प्रयोगशाळेतील प्रयोगानंतर मारबर्ग विषाणू संसर्ग समोर आला. त्यानंतर, अंगोला, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा येथे या विषाणू संसर्गची काही प्रकरणं नोंदवली गेली. माणसाला मारबर्ग विषाणूची लागण कशी झाली, याबाबत स्पष्ट माहिती नाही. पण हा विषाणू वटवाघळांमुळे पसरल्याचं म्हटलं जातं. 2008 मध्ये, युगांडामध्ये रुसेटस बॅट वसाहतीमधील गुहेला भेट देणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये या विषाणूचा संसर्ग सापडला.
WHO confirms Marburg disease Symptoms: मारबर्ग विषाणू संसर्गाची लक्षणे काय?
- ताप
- डोकेदुखी
- शरीरांतर्गत रक्तस्त्राव
मृत्यूचा दर 88 टक्के
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग विषाणू रोगाच्या संपर्कात आलेल्या लोकांना तीव्र ताप येतो. मारबर्ग व्हायरसमुळे 'मारबर्ग विषाणू रोग' (एमवीडी रोग) ची लागण होते. मारबर्ग विषाणू संसर्ग सुरुवातीला खाणींमध्ये किंवा रौसेटस वटवाघळांच्या गुहेत राहणाऱ्या लोकांमध्ये पसरला. तेथे केलेल्या तपासणीच्या आधारे समोर आलं की, एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाल्यास ताप येऊन रक्तस्राव होतो. मारबर्घ विषाणू संसर्गाचा मृत्यू दर 88 टक्के इतका अधिक आहे.
Marburg disease outbreak: मारबर्ग विषाणू कसा पसरतो?
मारबर्गला संक्रमित लोकांच्या रक्त स्रावाशी संपर्क आल्यास याचा संसर्ग होऊ शकतो. याशिवाय रुग्णांचे कपडे जसे की बेड इत्यादी वापरल्यासही या विषाणूचा संसर्ग पसरतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )