एक्स्प्लोर
Advertisement
व्हेनेझुएलामध्ये महागाई दरात तब्बल 10 लाख टक्क्यांनी वाढ
व्हेनेझुएलातील नागरिकांचा महिन्याचा सरासरी पगार पाहिला, तर त्यातून महिन्यात 24 अंडी किंवा अर्धा बर्गर यापैकी एकच गोष्ट येऊ शकते
कॅराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला देशात मोठ्या प्रमाणात महागाई उफाळली आहे. महागाईचा दर तब्बल 10 लाख टक्क्यांनी वाढल्याचं धक्कादायक वास्तव आहे.
सर्वसामान्य वस्तूंचे दर भडकल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त आहेत. व्हेनेझुएलातील नागरिकांचा महिन्याचा सरासरी पगार पाहिला, तर त्यातून महिन्यात 24 अंडी किंवा अर्धा बर्गर किंवा 300 ग्रॅम कॉफी किंवा अडीच किलो टॉमेटो किंवा साडेसहा किलो साखर किंवा तीन चतुर्थांश पिझा किंवा 2.8 लीटर ज्युस किंवा 1.7 किलो बटाटे यापैकी एकच पदार्थ घेऊ शकतात.
वाढलेल्या महामाईमुळे दररोज 5 हजार नागरिक व्हेनेझुएला देश सोडून शेजारच्या देशात स्थलांतरित होत आहेत. हे नागरिक त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये गेल्यामुळे या देशांचे नागरिकही हैराण आहेत.
अनेक जण रुग्णालय आणि विद्यापीठ सोडून जात आहेत. वकिलांवर कामगार किंवा सेक्स वर्कर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.
कोणे एके काळी व्हेनेझुएला हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. 1950 ते 1980 या काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत होती. व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन होत असल्याने इटली आणि स्पेनच्या प्रवाशांना हा दीपस्तंभ होता.
तेलाच्या किमतीतील चढउतार, चलन संकट आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश संकटात गेला. 2013 मध्ये बसचालक आणि युनियन लीडर राहिलेल्या निकोलस माडुरो यांच्या हाती देशाची सूत्रं गेली.
अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक देशांनी व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करण्यावर प्रतिबंध घातला आहे. याच कारणामुळे व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याचा दावा राष्ट्रपती निकोलस माडुरो यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement