डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाकडून भारताचा चुकीचा नकाशा शेअर, काश्मीरला पाकिस्तानमध्ये दाखवलं!
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा ट्रम्प ज्युनिअर यांनी भारताचा वादग्रस्त नकाशा ट्वीट केला आहे. या नकाशात काश्मीर भारताचाच भाग असल्याचं दाखवलं आहे.
US Elections : जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक सुरु आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की, डेमोक्रेटचे जो बायडेन जिंकणार याकडे संपूर्ण जगाचं लक्षं लागलं आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने भारताचा वादग्रस्त नकाशा ट्वीट केला आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने भारताचा वादग्रस्त नकाशा ट्वीट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने ट्वीट करत ट्रम्प समर्थक आणि बायडन समर्थक देशांना लाल आणि निळ्या रंगामध्ये दाखवलं आहे. ज्यामध्ये त्यांनी काश्मीरला पाकिस्तानचा भाग असल्याचं दाखवलं आहे. एवढंच नाहीतर, त्यांनी भारतालाही जो बायडन यांना समर्थन देणारा देश म्हणून दाखवलं आहे.
Okay, finally got around to making my electoral map prediction. #2020Election #VOTE pic.twitter.com/STmDSuQTMb
— Donald Trump Jr. (@DonaldJTrumpJr) November 3, 2020
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने जो नकाशा ट्वीट करत शेअर केला आहे. त्यामध्ये संपूर्ण जगाचा नकाशा दोन रंगांमध्ये दाखवला आहे. समोर आलेल्या नकाशामध्ये ट्रम्प यांच्या मुलाने आपल्या वडिलांना समर्थन देणाऱ्या देशांना लाल रंगाने आणि बायडन यांना समर्थन देणाऱ्या देशांना निळ्या रंगाने दाखवलं आहे. या नकाशात भारतासोबत चीन, मॅक्सिको आणि लायबेरिया यांना बायडन यांना समर्थन देणारे देश म्हणून दाखवण्यात आलं आहे.
अमेरिकेत नवी राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरु आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता मतदान प्रक्रिया थांबेल. मतदान झाल्यानंतर लगेच मतगणना सुरु होणार आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. यातच ट्रम्प यांनी ट्वीट करत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण- ट्रम्प
अमेरिकेच्या लोकांना धन्यवाद देत ट्रम्प यांनी ट्वीट केलं आहे की, आम्ही संपूर्ण देशात चांगल्या स्थितीत आहोत. अमेरिकत वोटिंग सुरु आहे. सर्वांनी मतदान करावं. माझ्यासाठी जिंकणं सोपं आहे मात्र हार पचवणं कठिण आहे, असं त्यांनी म्हटलंय.
पुढील वर्ष सर्वात महान इकॉनॉमी वर्ष असेल
आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत दावा केला होता की, त्यांच्या सरकारच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था 33.1 टक्क्यांनी सर्वात वेगाने वाढली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात पुढील वर्ष सर्वात महान इकॉनॉमी वर्ष असेल.
अमेरिकेत यंदा विक्रमी मतदान
अमेरिकेत यंदा राष्टपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानादावारे आपलं मतदान केलं होतं. यामुळं यंदा विक्रमी मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडत आहे. जवळपास 24 कोटी मतदाता मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट
इलेक्टोरल वोटिंगमध्ये बायडन आघाडीवर, तर आतापर्यंत 22 पैकी 12 राज्यात ट्रम्प जिंकले