Israel-Hamas Conflict : हमास विरुद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठिशी, इस्त्रायल पंतप्रधानांच्या संपर्कात, राष्ट्राध्यक्ष बायडन यांची माहिती
Biden on Israel-Palestine : हमास विरुद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठिशी असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी दिली आहे. इस्त्रायल पंतप्रधानांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Hamas Israel Attack : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) ने इस्रायल (Israel) वर हल्ला केल्यानंतर जगभरातील देश इस्रायलच्या समर्थनार्थ उतरले आहेत. महासत्ता अमेरिकेने हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला आहे. हमास विरुद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठिशी असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी दिली आहे. इस्त्रायल पंतप्रधानांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. इस्रायलच्या समर्थनार्थ मोठं पाऊल उचलण्याचा इशारा देत अमेरिकेने युद्धात सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
हमास इस्त्रायल युद्धात अमेरिकेचा इस्त्रायलला पाठिंबा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली आहे. बायडन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, "आम्ही इस्रायलला मदत करण्यासाठी सर्व प्रकारे तयार आहोत." बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोलल्यानंतर जो बायडन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "मी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना स्पष्ट केलं आहे की, आम्ही इस्रायलचे सरकार आणि लोकांना मदत करण्यासाठी सर्व योग्य आवश्यक संसाधने प्रदान करण्यास तयार आहोत."
Let there be no mistake: the United States stands with the State of Israel. pic.twitter.com/lRbPLflhzc
— Joe Biden (@JoeBiden) October 7, 2023
जो बायडन यांचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं की, "इस्रायलला स्वतःचा आणि आपल्या नागरिकांचा बचाव करण्याचा अधिकार आहे. या युद्धाच्या परिस्थितीत इस्रायलविरुद्ध परिस्थिती फायदा घेण्याचा विचार करणार्या इतर कोणत्याही पक्षाला अमेरिका इशारा देते." बेंजामिन नेतन्याहू यांनीही बायडन यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि हमासच्या विरोधात दीर्घ मोहीम राबविण्याच्या गरजेवर भर दिला.
हमास आणि इस्रायलकडूल प्रतिहल्ले सुरुच
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलकडूनही हल्ले सुरूच आहे. इस्रायली रणगाडे गाझामध्ये घुसले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायली सैन्याच्या सात बटालियन गाझामध्ये दाखल झाल्या आहेत. इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझापट्टी सीमेवर हमासचे तीन तळ उद्ध्वस्त केल्या आहेत, याआधी इस्रायलच्या नॅशनल रेस्क्यू सर्व्हिसने सांगितलं की, हमासच्या हल्ल्यात सुमारे 40 इस्रायली लोक मारले गेले आहेत. त्याचबरोबर शेकडो जखमींवर इस्रायलच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.