ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? व्हाईट हाऊसमधून गायब झालेली पत्रं ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये
US News : अमेरिकी राष्ट्रीय अभिलेखागार (US National Archives) ने डोनाल्ड ट्रम्प (Donald Tump) यांच्या रिसॉर्टमधून उअनेक पत्रं ताब्यात घेतली आहेत, जी व्हाईट हाऊसमधून अयोग्यरित्या हटवली गेली होती.
Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्रीय अभिलेखागार (US National Archives) विभागाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमधून उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किंम जोंग उन (Kim Jong Un) च्या पत्रासह अनेक पत्रं ताब्यात घेतली आहेत, जी व्हाईट हाऊसमधून (White House) अयोग्यरित्या हटवली गेली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्रव्यवहारासह दस्तऐवज आणि स्मृतीचिन्ह ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या शेवटी प्रेसिडेन्शिअल रेकॉर्ड कायद्यानुसार परत केले जाणार होते. परंतु वॉशिंग्टन पोस्टने अज्ञात स्त्रोतांचा हवाला दिला की, गेल्या महिन्यापर्यंत एजन्सीला रेकॉर्ड सापडले नाहीत. त्यानंतर हे रेकॉर्ड बॉक्स ट्रम्प यांच्या रिसॉर्टवर सापडले. एका वृत्तपत्राने ट्रम्प यांच्या एका माजी साहाय्यकाच्या हवाल्याने सांगितले की, ट्रम्प यांनी गुन्हेगारी हेतूने कृती केली आहे असे त्यांना वाटत नाही.
ट्रम्प यांनी 2018 मधील एका रॅलीमध्ये किम जोंग उनसोबतच्य संबंधाबाबत सांगितले होते की, ''आम्ही प्रेमात आहोत. त्यांनी मला सुंदर पत्र लिहिली आहेत.'' यानंतर मीडियाने तसेच त्यांचे सहकारी आणि विरोधकां ट्रम्प आणि किम यांच्यामधील पत्र व्यवहाराला ''प्रेम पत्र'' असेही संबोधले होते.
ट्रम्प यांच्या रिसॉर्टमधून रेकॉर्ड बॉक्स जप्त केल्यामुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षीय रेकॉर्ड कायद्यांचे पालनाविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Trending : जगातील सर्वात मोठं 'इग्लू रेस्टॉरंट', पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र, तुम्ही पाहिलं का?
- Madagascar Cyclone : मादागास्करमध्ये चक्रीवादळाचा कहर; 10 जण ठार, 48 हजार नागरिक बेघर
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक, अभ्यासात दावा
-
PM मोदींनी अमेरिका, युकेच्या पंतप्रधानांना पुन्हा टाकले मागे! पटकावले अव्वल स्थान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha