US School Shooting : अमेरिकेत मिशा न फुटलेल्या पोराचा शिकत असलेल्या हायस्कुलमध्येच गोळीबार; दोन विद्यार्थ्यांसह चौघांचा करुण अंत
US School Shooting : सीएनएनच्या वृत्तानुसार, या घटनेत ठार झालेल्यांमध्ये 2 शिक्षक आणि 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
US Georgia High School Shooting :अमेरिकेतील जॉर्जिया येथील अपलाची हायस्कूलमध्ये अल्पवयीन पोरोने केलेल्या गोळीबारात दोन शिक्षकांसह चौघांचा अंत झाला. या घटनेत 9 जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता ही घटना घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका 14 वर्षीय मुलाला अटक केली आहे, जो तेथील विद्यार्थी आहे. राजधानी अटलांटापासून 70 किमी अंतरावर असलेल्या विंडर शहरातील एका शाळेत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता हल्लेखोराने आत्मसमर्पण केले आणि जमिनीवर पडून राहिला. सीएनएनच्या वृत्तानुसार, या घटनेत ठार झालेल्यांमध्ये 2 शिक्षक आणि 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्यावर्षी सामूहिक गोळीबाराची धमकी दिली होती
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव कोल्ट ग्रे असे आहे. आता त्याच्यावर प्रौढांप्रमाणे खटला चालवला जाईल. पोलिसांना यापूर्वीही हल्लेखोराच्या कारवायांचा संशय होता. गेल्या वर्षी मे महिन्यात एफबीआयने कोल्टच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर सामूहिक गोळीबार करण्याची धमकी दिली होती. तरीही त्याला अटक झाली नव्हती. एपी न्यूज एजन्सीनुसार, 2024 मध्ये आतापर्यंत 30 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी 131 जणांचा मृत्यू झाला आहे. 2023 मध्ये सामूहिक गोळीबाराच्या 42 घटना घडल्या ज्यात 217 लोकांचा मृत्यू झाला. या संदर्भात, गेल्या वर्षी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट वर्ष होते.
At least two people killed, several others injured after shooting at a high school in Georgia, US. Jon Brain has the latest pic.twitter.com/C5wlJUpkcQ
— TRT World Now (@TRTWorldNow) September 4, 2024
जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
अधिकाऱ्यांनी बॅरी काउंटी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद केल्या आहेत. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे/
जॉर्जियाचे गव्हर्नर म्हणाले, लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा
जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांनी राज्य संस्थांना तातडीने मदत देण्यास सांगितले आहे. "मी जॉर्जियातील सर्व रहिवाशांना विनंती करतो की शाळेत उपस्थित असलेल्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करण्यासाठी माझ्या कुटुंबात सामील व्हा," असे त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. स्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाशी जवळून काम करत आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या