एक्स्प्लोर

US Elections Result: जो बायडन म्हणाले, 'आम्ही स्पष्ट बहुमताने जिंकू, विक्रमी 7.40 कोटी मतं मिळाली!'

US Elections Result: अमेरिकेत मागील चार दिवसांपासून मतगणना सुरु आहेत. अद्यापही अमेरिकेचा राष्ट्रपती कोण होणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.

US Elections Result:  अमेरिकेत मागील चार दिवसांपासून मतगणना सुरु आहेत. अद्यापही अमेरिकेचा राष्ट्रपती होणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. मात्र सध्या बायडन हे आघाडीवर असून ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.  डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बायडन यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. जो बायडन म्हणाले की, आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होणार आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्हाला 7.40 कोटींहून अधिक मतं मिळाली आहेत, जे आजवरच्या अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मतं आहेत. व्हाईट हाउसमध्ये पोहोचण्यासाठी उमेदवाराला  538 ‘इलेक्टोरल कॉलेज वोट’ पैकी 270 मतं मिळवणं गरजेचं आहे. ताज्या आकडेवारीनुसार बायडन यांना 264  इलेक्टोरल कॉलेज वोट मिळाले आहेत तर ट्रम्प यांना 213 मतं मिळाली आहेत.

बायडन आता एरिजोना, जॉर्जिया आणि पेनसिल्वेनियामध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. बायडन म्हणाले की, आम्ही 24 वर्षांनंतर एरिजोना आणि  जॉर्जिया जिंकणार आहोत. ते म्हणाले की, मला कल्पना आहे की, या अवघड निवडणुकीनंतक तणाव वाढू शकतो मात्र आपल्याला शांतता राखायची आहे. आपण विरोधी असू शकतो मात्र दुश्मन नाही, असं बायडन म्हणाले.  बायडन पेनसिल्वेनियामध्ये 9,000 तर जॉर्जियामध्ये 1,500 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

US Elections Result: उर्वरित पाचपैकी चार राज्यांमध्ये बायडन आघाडीवर, ट्रम्प यांचा रस्ता कठिण

अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत आता स्पष्ट होत आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. जॉर्जिया हा रिपब्लिकनचा गड मानला जातो.  जॉर्जिया राज्याच ट्रम्प आणि बायडन यांच्या मतांमधील अंतर चांगलेच वाढले आहे. यामुळं आता ट्रम्प यांचा विजयाचा रस्ता आणखी कठिण झाला आहे.

अमेरिकेचे हाउस स्पीकर आणि काँग्रेसचे टॉप डेमोक्रेट नॅन्सी पेलोसी यांनी जो बायडन यांना अमेरिकेचे  "प्रेसिडेंट इलेक्ट " असं म्हटलं आहे. पेलोसी यांनी म्हटलं की, बायडन आणि कमला हॅरिस विजयाच्या जवळ आहेत. तर ट्रम्प यांचे निवडणूक अभियान अधिकारी मॅट मॉर्गन यांनी म्हटलंय की, निवडणूक अजून संपलेली नाही. बायडन स्वत:ला चार राज्यांच्या आघाडीच्या जोरावर विजेता झाल्याचं सांगत आहेत. मात्र फायनल निकाल अद्याप बाकी आहे.  जॉर्जियामध्ये दुसऱ्यांदा वोटिंग होईल, आम्हाला विश्वास आहे की, राष्ट्रपती ट्रम्प नक्की बाजी मारतील.  राष्ट्रपती ट्रम्प यांनी म्हटलंय की, मी या चारही राज्यात काल रात्रीपर्यंत आघाडीवर होतो. आता आश्चर्यकारक पद्धतीनं आघाडी गेली. आमची कायदेशीर लढाई सुरु आहे. आम्ही पुन्हा आघाडी मिळवू, असं ट्रम्प म्हणाले.

जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तर भारतावर काय परिणाम होणार?

रिपब्लिकन नॅशनल कमिटी गोळा करणार 60 मिलियन डॉलर या निवडणुकीच्या कायदेशीर लढाईसाठी रिपब्लिकन नॅशनल कमिटी जवळपास 60 मिलियन डॉलर गोळा करणार असल्याची माहिती आहे. ट्रम्प यांच्या टीमनं टीम मिशिगन, पेंसिलवेनिया, जॉर्जिया आणि नवादामध्ये केसेस दाखल केल्या आहेत. तर  विस्कॉन्सिनमध्ये मतगणना पुन्हा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने काल फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी देखील आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.

US Election: राष्ट्रपती ट्रम्प यांना धक्का, मिशिगन-जॉर्जियामधील केसेस कोर्टानं फेटाळल्या

बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले 

बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264  इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 213 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले. मतगणनेत घोटाळ्याचा आरोप करत ट्रम्प समर्थकांनी एकीकडे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये निकालाविरोधात केसेस करण्यात आल्या आहेत. यामुळं अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून श्री ठाणेदार झाले आमदार

पॉप्युलर मतांमध्ये ट्रम्प यांना टाकलं मागे

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत सात कोटींहून अधिक मतं मिळाली आहेत. लाखो मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पॉप्युलर मतं मिळवणाराच उमेदवार राष्ट्रपती पदी विराजमान होतो, असं नाही. निवडणूकांमध्ये विजय मिळवण्यासाठी 270 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रोल मतं मिळवणं आवश्यक असतं. आतापर्यंत बायडन यांना 264 मतं मिळाली आहेत, तर ट्रम्प यांच्या खात्यात 213 इलेक्ट्रोरल मतं आहेत.

या राज्यांची मतगणना बाकी

अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत. यापैकी आतापर्यंत 22 राज्यांमध्ये ट्रम्प यांनी तर 20 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे.तर पाच राज्यांचा निकाल येणं अद्याप बाकी आहे.  11 सीट असलेलं एरिजोना, 16 सीट असलेलं जॉर्जिया,  सहा जागा असलेलं  नेवाडा, 15 सीट असलेलं नॉर्थ कॅरोलीना आणि 20 सीट असलेलं पेनसिलवेनिया या राज्यांचा निकाल येणं बाकी आहे. या राज्यांमध्ये एकूण 77 इलेक्टोरल वोट्स आहेत. या मतांवर आता ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य अवलंबून आहे.

या राज्यांमध्ये जिंकले ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी इदाहो, लोवा, फ्लोरिडा, साउथ डकोटा, मिसौरी, लुइसियाना, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, अरकांसस, अलबामा, मिसिसिपी, मोनटाना, ओहियो, ओक्लाहोमा, टेनेसी, केंटकी, वेस्ट वर्जीनिया, व्योमिंग, टेक्सास, साउथ कॅरोलिना, इंडियाना, उताह आणि वियोमिंग मध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.

बायडन यांनी या राज्यांमध्ये विजय मिळवला

बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या

US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा आरोप

US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट

US Election Results LIVE | बायडन 270 च्या जादुई आकड्याजवळ पोहोचले, ट्रम्प अद्याप मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget