एक्स्प्लोर
Advertisement
मसूद अजहरचा आज संयुक्त राष्ट्रात फैसला, चीनच्या भूमिकेवर नजर
मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रस्ताव ठेवला होता. पण प्रत्येक वेळी चीनने आपल्या मताचा वापर करुन तो मंजूर होऊ दिला नव्हता. यावेळीही चीनने मसूदविरोधात आणखी पुरावे मागितले आहेत.
नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला घेरण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक होत आहे. या बैठकीत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायचं की नाही हे निश्चित होणार आहे. या मोहिमेत भारताला अमेरिकेची साथ आहे.
भारत आणि अमेरिका सोबत काम करत आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहेत आणि मसूद त्याचा म्होरक्या आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं लागेल. भारतीय उपखंडातील शांतता मसूद अजहरमुळे धोक्यात येत आहे.
मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रस्ताव ठेवला होता. पण प्रत्येक वेळी चीनने आपल्या मताचा वापर करुन तो मंजूर होऊ दिला नव्हता. यावेळीही चीनने मसूदविरोधात आणखी पुरावे मागितले आहेत. आता पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मसूद अजहरविरोधी वातावरण तयार झालं आहे. एवढंच नाही तर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटननेही प्रस्ताव आणला आहे.
14 फेब्रुवारी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायू दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला होता.
याशिवाय 50 वर्षीय मसूद अजहरने भारतात अनेक अतिरेकी हल्ले केले आहेत, ज्यात संसद भवनावरील हल्ला, पठाणकोट हवाई तळावरील हल्ला, उरी हल्ला, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सैन्याच्या तळांवरील हल्ल्याचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement