Underworld Don Dawood Ibrahim: "भाई 1 हजार टक्का फीट, मौत की अफवाहें गलत"; दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा दावा
Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम... या एका नावानं जगभरात खळबळ माजवली आहे. पण दाऊदला नेमकं झालंय काय? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
UnderWorld Don Dawood Ibrahim: बारा मुल्कों की पुलिस किसको ढूंढ रही है... हे वाक्य गेल्या कित्येत दिवसांपासून फक्त एकाच व्यक्तीला लागू होतं, ती व्यक्ती म्हणजे, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim). तब्बल दोन दिवसांपासून जगभरात फक्त एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे, दाऊद (Dawood Ibrahim). मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोस्टवॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून तो कराचीमधील (Karachi) रुग्णालयात दाखल आहे, असं सोशल मीडियावर बोललं जात आहे. तेव्हापासूनच सोशल मीडियासह जगभरात खळबळ माजली आहे. नेमकं खरं काय? खोटं काय? याचा शोध जगभरातील एजन्सीकडून घेतला जात आहे. अशातच दाऊद इब्राहिमबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दाऊद अगदी ठणठणीत असून त्याला काहीच झालेलं नाही, त्याच्या मृत्यूच्या बातम्याही अगदी खोट्या असल्याचा दावा समोर आला आहे.
मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी सोमवारी (19 डिसेंबर) चर्चेत होती. एका पाकिस्तानी पत्रकारानं सोशल मीडियावर सांगितलं की, दाऊदची पाकिस्तानातील कराचीमध्ये भरती करण्यात आली आहे, परंतु या दाव्यांमागील सत्य कोणालाही माहिती नाही. पाकिस्तानी वृत्तपत्रांनीही दाऊदबद्दल काहीच माहिती दिलेलं नाही. पाकिस्तानातील काही वृत्तपत्रंही सोशल मीडियाच्याच हवाल्यानं बातम्या देत होते. दरम्यान, दाऊद पूर्णपणे बरा असून त्याला काहीही झालं नसल्याचं समोर आलं आहे. इंडिया टुडेच्या विश्वसनीय गुप्तचर सूत्रांनी दाऊदवर विषप्रयोग किंवा तो रुग्णालयात दाखल असण्याचं, त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.
भाई, 1 हजार टक्का फीट : छोटा शकील
दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकील यानं त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा आणि रुग्णालयात दाखल झाल्याचा इन्कार केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना छोटा शकील म्हणाला, भाई 1000 टक्के फिट आहे. दाऊदच्या मृत्यूच्या अफवा चुकीच्या हेतूनं पसरवल्या जात असल्याचंही त्यांनं सांगितलं.
दाऊदची प्रकृती चिंताजनक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर अनेक यूजर्सकडून केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे, त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं आहे. दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, दाऊदवर खरंच विषप्रयोग झालाय का? याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वृत्त हाती आलेलं नाही. मात्र, मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून (पुतण्या अलिशा पारकर आणि साजिद वागळे) याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
गुन्हेगारीच्या जगात कसा आला दाऊद?
दाऊद इब्राहिमचं खरं नाव शेख दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्यांचे वडील शेख इब्राहिम अली कासकर हे मुंबई पोलिसांत हवालदार होते. आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी त्याला शिक्षण सोडायला लावलं होतं. यानंतर दाऊद गुन्हेगारीच्या जगात आला. आधी त्यानं तत्कालीन डॉन हाजी मस्तानसोबत काम केलं आणि नंतर त्याच्यापासून वेगळं होऊन दुबईतून काम करायला सुरुवात केली. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात असल्याचं बोललं जात आहे.
एस. हुसैन झैदी यांच्या 'मोस्ट वॉन्टेड एक, नाम आनेक' या पुस्तकात दाऊदची 13 नावं असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात तो 'मुच्छाद' म्हणून ओळखला जात होता. भारतात तो ज्यावेळी फोन करतो, त्यावेळी तो हाजी साहेब किंवा अमीर साहेबांच्या नावानं हाक मारतो.