Ukraine-Russia War : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
Ukraine-Russia War : रशियाने हल्ला केल्यापासून युक्रेन भारताकडे आशेने पाहत आहे. तिथले राजदूत असोत किंवा राष्ट्रपती झेलेन्स्की स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला प्रभाव वापरण्याचे आवाहन करत आहेत. आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी दोनदा फोनवर चर्चा केली आहे. युक्रेनच्या युद्धग्रस्त प्रदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरुच आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर बोलणार आहेत. त्यानंतर मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहे. या चर्चेत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षीत बाहेर काढण्याच्या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रशिया युद्ध थांबवणार का? रशिया युक्रेन युद्धावर काही समाधानकारक तोडगा निघणार का? हे पाहावे लागणार आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा करणार आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या चार दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनमधील परिस्थितीची माहिती दिली होती.
रशिया-युक्रेन युद्धाचा आज 12 वा दिवस असून हे युद्ध अजूनतरी थांबण्याचं नाव घेईना. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा जगातील इतर राष्ट्रांना या वादात न पडण्याची ताकीद दिली आहे. 'युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'ची घोषणा करणारं कोणतंही राष्ट्र हे थेट रशिया-युक्रेन वादात पडल्याचं गृहीत धरु', असं पुतिन यांनी म्हटलं आहे.
जगभरातील विविध देश तसंच संस्था युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत असून आतापर्यंत तरी जगभरातील महासत्तांना अपयश आले आहे. रशिया आणि युक्रेन अशा दोन्ही देशांना युद्धामुळे हाणी सहन करावी लागत आहे. दरम्यान अशामध्ये युक्रेनला 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्याची मागणी राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली होती. मात्र, नाटोने या मागणीला नकार दिला. त्यानंतर झेलेन्स्की यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान आता पुतिन यांनी या नो फ्लाय झोनबाबत बोलताना युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करणारा कोणताही देश या युद्धात पडल्याचं समजलं जाईल, असं पुतिन म्हणाले.
युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय दूतावासाने योजना आखली आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे की, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोल्टावामार्गे पश्चिम सीमेवर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी पोल्टावा शहरातील भारतीय दूतावासाची टीम तैनात आहे. योजना राबवण्याची वेळ आणि तारीख लवकरच प्रसिद्ध केली जाईल. दूतावासाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना अल्प सूचनेवर सुमी सोडण्यास तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: