Russia-Ukraine conflict : युक्रेन-रशियात पुन्हा एकदा तणाव, रशियाकडून क्षेपणास्त्रांसह युद्धाभ्यास सुरु
Russia-Ukraine conflict : जागतिक विरोध डावलत रशियानं राष्ट्रपती पुतीन यांच्या उपस्थितीत क्षेपणास्त्रांसोबत युद्ध अभ्यास केल्याने अमेरीकेचीदेखील चिंता वाढली आहे.
Russia-Ukraine conflict : यूक्रेन आणि रशियात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. रशियानं क्षेपणास्त्रांसोबत युद्ध अभ्यास सुरु केल्याने युरोपीयदेशांची चिंता वाढली आहे. जागतिक विरोध डावलत रशियानं राष्ट्रपती पुतीन यांच्या उपस्थितीत क्षेपणास्त्रांसोबत युद्ध अभ्यास केल्याने अमेरीकेचीदेखील चिंता वाढली आहे. जागतिकस्तरावरील भू-राजकीय तणावामुळे जगभरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. यूक्रेन आणि रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी, अमेरीका, फ्रान्ससारख्या देशांकडून आपल्या नागरिकांना यूक्रेन ताबडतोब सोडण्याचं आवाहन केले आहे. पुतीनने जागतिक विरोध डावलत क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याने अमेरिकेने रशियाला इशारा देऊ केलाय. सोबतच जगाला सांगतानाच रशियायूक्रेनवर कधीही हल्ला करु शकतो आणि त्यामुळे जर यूक्रेनवर हल्ला झाल्यास त्याला उत्तर आम्ही देऊ असं देखील म्हंटलं आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांआधी रशियानं आपलं सैन्य मागे घेतल्याचा दावा केला होता. तसे फोटो देखील रशियन दूरचित्रवाहिण्यांवर दाखवले होते. मात्र, हा सर्व बनाव असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर अमेरिकेने रशियाला यूक्रेनवर हल्ला न करण्याचा इशारा देखील देऊ केला. मात्र रशियानं नाटोमुळे आमची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचं म्हणत युद्ध अभ्यास सुरुच ठेवलाय.
यूक्रेनच्या सीमेवर 40 टक्के रशियन सैन्य तैनात असल्याचा दावा करण्यात आला आहे. बेलारूसमध्ये देखील रशियाचे सैन्य तैनात आहेत. त्यामुळे युरोपीय देशांना युद्ध होणार का? याची चिंता सतावते आहे. फ्रान्स, ब्रिटनसारख्या देशांकडून युद्ध टाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पुतीन यांच्यासोबत बातचीत देखील करण्यात आली, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. यूक्रेनमधील रशियाच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या भागात स्फोट आणि गोळीबार सुरु आहेत. यात यूक्रेनचे दोन सैनिक ठार झालेत.
भारतीय दूतावासाकडून काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक काढत गरज नसल्यास भारतीय विद्यार्थ्यांनी परत यावे असे आवाहन केले होते. सोबतच भारतीय नागरिकांना देखील गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. तिकडे, यूक्रेनमधील परिस्थिती बिघडत असल्याचं दिसताच भारताकडून देखील एअर इंडियाच्या तीन फ्लाईट्स भारताकडे 22, 24 आणि 26 फेब्रुवारी रोजी झेपावणार आहे. त्यामुळे यूक्रेन आणि रशियात संघर्ष होत युद्ध होणार का? याची तांगती तलवार जगावर असेल.
रशिया जगातला तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. युरोपातल्या अनेक देशांना रशिया तेल पुरवतो. अशातच युरोपास युद्ध नकोय. अमेरीकेकडून देखील तसेच प्रयत्न आहे. मात्र, रशियाकडून होत असलेल्या खेळीमुळे संघर्ष घडवेल आणि तो कोणत्या ((चीन, शी जिनपिंगचा फोटो वापरा)) देशाला पोहोचवेल आणि किती बळी घेईल हे येणारा काळच ठरवेल.