UK PM Election : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषि सुनक एक पाऊल पुढे, मतदानाच्या दुसऱ्या फेरीतही आघाडी
Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांनी दुसऱ्या फेरीतही बाजी मारली आहे.
UK PM Election : भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rishi Sunak) ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक पाऊल पुढे पोहोचले आहेत. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी मतदानाच्या दुसऱ्या फेरीतही बाजी मारली आहे. यामुळे ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मतदानाच्या दुसऱ्या फेरीत 101 मतांसह ऋषी सुनक विजयी झाले आहेत. ऋषी सुनक यांच्यासमोर आणखी चार उमेदवार आहेत. दुसऱ्या फेरीत भारतीय वंशाचे अटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांचा 27 मतांनी पराभव झाला. त्यामुळे ते आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत.
दुसऱ्या फेरीत अर्थमंत्री पेनी मॉर्डेंट यांना 84 मते, परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 64 मते, माजी कॅबिनेट मंत्री केमी बॅडनोक यांना 49 मते आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते टॉम तुगेंदत यांना 49 मते मिळाली. मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर या शर्यतीत केवळ दोन चेहरे राहतील. गुरुवारपर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होईल.
ऋषी सुनक यांची पहिल्या फेरीतही बाजी
पहिल्या फेरीच्या मतदानात उर्वरित आठ उमेदवारांमध्ये लढत होती. ऋषी सुनक यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीतही बाजी मारली. ऋषी सुनक 88 मतांसह आघाडीवर आहेत. ब्रिटनचे नवे पंतप्रधान सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेतील. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सुनक यांच्या व्यतिरिक्त या यादीमध्ये परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस, अर्थमंत्री पेनी मॉर्डेंट, माजी कॅबिनेट मंत्री केमी बॅडनोक, खासदार टॉम तुगेंदत आणि ब्रिटिश कॅबिनेट अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांचा समावेश आहे. पेनी यांना 67, लिझ 50, कॅमी 40, टॉम तुगेंदत 37 आणि सुएला ब्रेव्हरमन यांना 32 मते मिळाली. मात्र, सुएला आता तिसऱ्या फेरीत शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांना मोठं यश, मतदानाच्या पहिल्या फेरीत मारली बाजी
- UK Prime Minister : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी; 11 जणांची नावं चर्चेत
- Britain Political Crisis : भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी? कोण आहेत ऋषि सुनक?