एक्स्प्लोर

UK Election 2024 : सासू सूधा मूर्तींची संसदेत खासदार म्हणून निवड,दुसरीकडे जावई ऋषी सुनक यांचं ब्रिटनमधील सरकार धोक्यात

Rishi Sunak : ब्रिटनमध्ये आज मतदान सुरु असून ऋषी सुनक यांच्यासमोर सरकार वाचवण्याचं आव्हान आहे.

UK Election 2024 : ब्रिटनमध्ये निवडणुकीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी मतदान सुरु झालं असून ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासमोर सरकार वाचवण्याचं आव्हान आहे. ब्रिटनची जनता ऋषी सुनक यांच्या 20 महिन्यांच्या सरकारला पुन्हा सत्ता देणार की विरोधकांना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि कंर्जव्हेटिव्ह पार्टीचे उमेदवार ऋषी सुनक यांना या निवडणुकीत तगडं आव्हान आहे. मागील 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंर्जव्हेटिव्ह पार्टीची सत्ता यावेळी धोक्यात असल्याचं दिसून येत आहे. 

ब्रिटनमध्ये आज मतदान

निवडणुकीच्या आधीच्या कलांनुसार, ही निवडणूक कंर्जव्हेटिव्ह पार्टीसाठी कठीण गेल्याचं म्हटलं जात आहे.  कलांनुसार, कंर्जव्हेटिव्ह पार्टीला यंदा विरोधी पक्ष लेबर पार्टीचं जोरदार आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे. ब्रिटनमध्ये 4 जुलैला मतदान पार पडत असून ब्रिटनची जनता नेत्यांच्या भविष्याचा निर्णय घेणार आहे. या निवडणुकीत ऋषी सुनक यांची टक्कर थेट लेबर पार्टीचे नेते केयर स्टारर यांच्यासोबत आहे.

ऋषी सुनक विरुद्ध केयर स्टारर

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष आणि विरोधी लेबर पार्टीचे केयर स्टारर यांच्यात मुख्य लढत असल्याचं सांंगितलं जात आहे. निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये लेबर पार्टी बहुमत मिळवण्याचा दावा करत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे नेतृत्व केयर स्टारर करत आहेत. ब्रिटनमध्ये पार पडत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

ऋषी सुनक (Rishi Sunak)

कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, आतापर्यंत ज्या प्रकारची निवडणुकीचे कल हाती आले आहेत, त्यावरुन यावेळी त्यांचा विजयाचा मार्ग सोपा नसल्याचं म्हटलं जात आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनमधील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा दावा करत असले तरी अनेक आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यांनी दिलेली आश्वासने न पाळल्याने त्यांच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले आशियाई आणि हिंदू पंतप्रधान आहेत.

केयर स्टारर (Keir Starmer)

कामगार पक्षाचे नेते केयर स्टारर हे माजी मानवाधिकार वकील आणि मुख्य सरकारी वकील आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात लेबर पार्टीने बहुमत मिळवण्याचा दावा केला आहे. यामुळे केयर स्टारर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केयर स्टारर हे सार्वजनिक अभियोगांचे माजी संचालक आहेत. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी लेबर पार्टीत प्रवेश केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Embed widget