(Source: ECI/ABP News/ABP Majha)
U.S.forgives student loans : यूएसने 40,000 विद्यार्थ्यांचे कर्ज माफ केले, आणखी 3.6 दशलक्ष नागरिकांना दिली मदत
U.S.Forgives Student Loans : अमेरिकेत जो बायडेन यांच्या प्रशासनाने जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या कर्ज वसुलीला विराम दिला गेला आहे
U.S.Forgives Student Loans : यूएस डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनने 40,000 विद्यार्थ्यांचे कर्ज रद्द केले आहे, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मदत करण्यासाठी मंगळवारी घोषित केलेल्या योजनेअंतर्गत आणखी 3.6 दशलक्ष लोकांना त्यांचे कर्ज फेडण्यास मदत करण्यात येणार असून शासनाकडून क्रेडिट ऑफर देखील केले आहे. अशी माहिती अमेरिकेचे शिक्षण सचिव मिगुएल कार्डोना यांनी दिली आहे.
जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या कर्ज वसुलीला विराम
अमेरिकेत जो बायडेन यांच्या प्रशासनाने जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या कर्ज वसुलीला विराम दिला गेला आहे, बायडेन यांच्या 2020 च्या अध्यक्षीय प्रचारात, त्यांनी प्रत्येक कर्जदारासाठी $10,000 विद्यार्थ्यांचे कर्ज रद्द करण्याचे आवाहन केले होते, सरकारने सांगितले की, फेडरल स्टुडंट लोन प्रोग्राममध्ये पात्र असलेल्या सर्व कर्जदारांसाठी ही दिलासादायक बाब असून प्रशासनाचे हे "ऐतिहासिक यश" आहे.
40,000 कर्जदारांचे त्वरित कर्ज रद्द
सार्वजनिक सेवा कर्ज माफी (PSLF) कार्यक्रमांतर्गत किमान 40,000 कर्जदारांना त्वरित कर्ज रद्द करण्यात येणार आहे. जुनी कर्जे असलेल्या अनेक कर्जदारांनाही उत्पन्न-चालित परतफेड (IDR) कर्जमाफी मिळेल, तसेच आणखी 3.6 दशलक्ष कर्जदारांना IDR माफीसाठी किमान तीन वर्षांचे अतिरिक्त क्रेडिट मिळेल, असे शिक्षण विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. कमी-उत्पन्न असलेल्या कर्जदारांना ठराविक वर्षानंतर उर्वरित शिल्लक भरणे आणि माफ करणे आवश्यक असलेली रक्कम मर्यादित करतात, सार्वजनिक सेवक म्हणून काम करणारे कर्जदार 10 वर्षांची पात्रता भरल्यानंतर PSLF अंतर्गत माफीसाठी पात्र असतात.
41 दशलक्ष कर्जदारांना किमान तात्पुरता दिलासा
एज्युकेशन डेटा इनिशिएटिव्ह नुसार सुमारे 43.4 दशलक्ष कर्जदार फेडरल लोन पोर्टफोलिओमधून सुमारे $1.6 ट्रिलियन थकबाकी असल्याचे समजते, म्हणजेच प्रत्येकी सरासरी $37,000 पेक्षा जास्त कर्ज बाकी आहे. बायडेन प्रशासनाने त्यांच्या पहिल्या वर्षात 725,000 कर्जदारांसाठी 17 अब्ज डॉलरहून अधिक कर्ज रद्द केले आणि कर्ज परतफेडीवर विराम दिला ज्यामुळे 41 दशलक्ष कर्जदारांना किमान तात्पुरता दिलासा मिळाला, असे शिक्षण विभागाने सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज हे अर्थव्यवस्थेवर ओढाताण म्हणून पाहिले जाते, पदवीनंतर अनेक वर्षे तरुणांवर याचा बोजा पडतो, मात्र आता कर्जाच्या विस्तृत उपलब्धतेमुळे शिक्षण शुल्क वाढण्यास हातभार लागला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI