एक्स्प्लोर

Turkey Earthquake : भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत, दुर्घटनेत 4000 हून अधिक जणांचा मृत्यू

Turkey Earthquake Updates : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Turkey Earthquake Updates : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के बसले. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने असोसिएट (Associated Press) प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतातूनही तुर्कीसाठी मदत पाठवण्यात आली आहे. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झालं आहे.

भूकंपामुळे 4000 हून अधिक जणांचा मृत्यू

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपातील मृतांच्या आकडा 4000 वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखालून अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शोध आणि बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या भूकंपामध्ये सुमारे 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात दिला आहे. विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारताकडून तुर्कीमध्ये पोहोचला आहे. यासोबतच भारताची पॅरोमेडिकल टीमही तुर्कीला पोहोचली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. तुर्कीमध्ये सोमवारी सकाळी मोठा भूकंपाचा धक्का बसला हा धक्का 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यानंतरही भूकंपाचं सत्र सुरुच होतं, त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले.

भारताची मदत तुर्कीला पोहोचली

सोमवारी सकाळी तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. तुर्की आणि सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बर्फवृष्टीमुळे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना अधिक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Turkiye Earthquake : तुर्की-सीरियात हाहा:कार! 24 तासांत 40 हून अधिक भूकंपाचे धक्के; 10 महत्त्वाचे मुद्दे

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget