एक्स्प्लोर
लादेनसारखीच कारवाई, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात टीटीपीचा म्होरक्या ठार
आता तहरीक ए तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) म्होरक्या मुल्ला फजलुल्ला याला ड्रोन हल्ल्यात ठार केलं.

इस्लामाबाद: अमेरिकेने पुन्हा एकदा लादेनवरील कारवाईसारखीच कारवाई केली आहे. लादेनला ठार केल्याप्रमाणे, आता तहरीक ए तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) म्होरक्या मुल्ला फजलुल्ला याला ड्रोन हल्ल्यात ठार केलं. अमेरिकेने अफगाणिस्तान पूर्वेकडील कुनार प्रांतात दहशतवादी मुल्ला फजलुल्लाचा खात्मा केला. अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कुनार प्रांतात 13 जूनपासून सुरक्षा रक्षकांची मोहिम सुरु होती. यावेळी मुल्ला फजलुल्ला हा जवानांच्या निशाण्यावर होता. तहरीक-ए-तालिबान ही संघटना अलकायदाशी संलग्न आहे. या संघटनेनेच फैजद शहजाद या अतिरेक्याला टाईम्स स्क्वेअर हल्ल्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं. दरम्यान, अमेरिकेने नुकतंच दहशतवादी मुल्ला फजलुल्लाची माहिती देणाऱ्याला 50 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 34 कोटी रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. मुल्ला फजलुल्ला हा 2010 मधील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वायर बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी होता. शिवाय पाकिस्तानातही त्याने अनेक कारवाया केल्या होत्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























