एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रम्प-मोदींच्या भेटीनंतर पाकला अक्कल, सईदच्या तेहरीक-ए-आझादीवर बंदी
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पाकिस्तानला अक्कल आली आहे. दहशतवाद्यांना नेहमीच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील तेहरीक-ए-आझादी संघटनेवर बंदी घातली आहे.
सईदच्या जमात-उद-दावा ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये तहरीक-ए-आझादी या नावाने कार्यरत आहे. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात याच संघटनेचा हात होता. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याच्या निर्णयाद्वारे पाककडून दहशतवाद विरोधी लढ्यात आपणही सक्रिय सहभागी असल्याचे दर्शवण्याचा तोकडा प्रयत्न केला जात आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांनी दहशतवाद विरोधातील लढाई तीव्र केली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे आड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेकडून ड्रोन हल्ल्याची योजना आखण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने हा निर्णय मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वीच घेतला आहे.
शिवाय, पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरही ट्रम्प प्रशासनाने निर्बंध आणले असून, पाकची सर्वबाजूने कोंडी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानने जानेवारी महिन्यापासून हाफीज सईदला नजरकैदेत ठेवलंय. तसेच त्याची जमात-उद-दावा संघटनेच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश पाकिस्तान सरकारने दिले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानकडून हाफीज सईदच्या संघटनेवर कारवाई करण्यात आली असली, तरी हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनवर कोणतही कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण मोदी-ट्रम्प भेटीनंतर अमेरिकेकडून सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पण त्याला विरोध करत पाकिस्तानने ही कारवाई आयोग्य असल्याचं म्हणलं होतं.
संबंधित बातम्या
सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा तिळपापड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement