(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jordan Gas Leak : जॉर्डनमध्ये विषारी वायूची गळती; 12 जणांचा मृत्यू, 251 लोक जखमी
Jordan Gas Leak : जॉर्डन बंदरामध्ये विषारी वायूची गळती होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 251 जण जखमी झाले आहेत.
Jordan Gas Leak : जॉर्डन बंदरामध्ये विषारी वायूची गळती होऊन 12 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. सुमारे 251 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले आहेत. जॉर्डनमधील वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी जॉर्डन बंदरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. बंदरामध्ये एका गॅस टँकचा मोठा स्फोट झाला. गॅस टँक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना ही दुर्घटना घडली आहे. गॅस टँकच्या स्फोटामुळे विषारी वायूची गळती झाली यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 251 जण जखमी असून त्यांना श्वसनात अडथळे येत आहेत.
जॉर्डन बंदरात गॅस टँकची वाहतूक केली जात असताना अचावक टँकमधून वायूची गळती सुरु झाली. या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवणे शक्य झालं नाही आणि त्यानंतर गॅस टँकचा स्फोट होऊन विषारी वायूची गळती झाली.
At least 10 people have died and more than 250 injured after a toxic gas leak at Aqaba Port in Jordan. pic.twitter.com/kjTDaPkelw
— Suzanne (@suzanneb315) June 27, 2022
'या' विषारी वायूची गळती
स्फोट झालेल्या गॅस टँकमध्ये क्लोरीन (Chlorine) गॅस होता. क्लोरीन गॅसचा पाण्यासोबत संपर्क आल्यास अॅसिड तयार होते. याचा श्वसनावाटे, तोंडावाटे शरीरात गेल्यास किंवा याचा त्वचेशी संपर्क आल्यास मानवाच्या शरीरासाठी नुकसानदायक ठरते.
दरम्यान, जॉर्डनच्या अल-घाद या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी जॉर्डन बंदरातील दुर्घटनाग्रस्त जागा रिकामी केली आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा परिसर सील करण्यात आला असून गळती थांबवण्यासाठी तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी कार्यरत आहे.