श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती
श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तिलक मरापना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात दुर्दैवाने 207 जणांना मृत्यू झाला आहे. तर 450 जण जखमी झाल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.
कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 207 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.
श्रीलंकेतील उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती कोलंबोतील नॅशनल हॉस्पिटलने दिली आहे. लोकशिनी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी मृत भारतीयांची नावे आहेत, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून दिली.
Indian High Commission in Colombo has conveyed that National Hospital has informed them about the death of three Indian nationals. Their names are Lokashini, Narayan Chandrashekhar and Ramesh. We are ascertaining further details. /3
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 21, 2019
VIDEO | श्रीलंकेतल्या स्फोटांमागे नॅशनल तौहीद जमात? | एबीपी माझाI conveyed to the Foreign Minister of Sri Lanka that India is ready to provide all humanitarian assistance. In case required, we are ready to despatch our medical teams as well.
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 21, 2019
श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तिलक मरापना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात दुर्दैवाने 207 जणांना मृत्यू झाला आहे. तर 450 जण जखमी झाल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली. तसेच श्रीलंकेला या कठीण प्रसंगी सर्वोतोपरी मदत करण्याचं आणि आरोग्य सेवा पुरवण्याचं तयार असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं. श्रीलंकेतील भारतीयांसाठी +94777903082 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.
राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना झालेल्या या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका देश हादरला. पहिला स्फोट कोलंबो येथील सेंट अँटनी चर्च, दुसरा स्फोट कोलंबो शहराच्या बाहेर नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये , तिसरा स्फोट पूर्वेकडील बाट्टिकालोआ चर्चमध्ये झाला. ज्या हॉटेलांमध्ये स्फोट झाले त्यात शांगरीला, द सिनामॉन ग्रँड आणि द किग्सबरी यांचा समावेश आहे.
बॉम्बस्फोटांमुळे कोलंबोतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आपत्तीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
VIDEO | सहा साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत पुन्हा दोन बॉम्बस्फोट | एबीपी माझासंबंधित बातम्या
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी