(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GK : 'या' देशात नाही एकही ट्राफिक सिग्नल! ना कधी उद्भवत वाहतूक कोंडीची समस्या; मग कशा चालतात गाड्या? पाहा...
रस्त्यावरुन चालताना ट्राफिक सिग्नलचं पालन करणं खूप महत्त्वाचं असतं. पण एक देश असाही आहे जिथे एकपण ट्राफिक सिग्नल नाही. अशा वेळी लोक रस्त्यावरुन प्रवास करताना खबरदारी कशी घेतात? जाणून घेऊया...
Traffic Signal: जगातील कोणत्याही देशात गेलात तरी तिथे तुम्हाला ट्राफिक सिग्नल (Traffic Singnal) दिसतीलच. वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या सोडवण्यासाठी आणि वाहन चालवताना शिस्त नेमून देण्यासाठी ट्राफिक सिग्नलचा वापर होतो. जर कधी ट्राफिक सिग्नलमध्ये बिघाड झाला तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. हे सगळं असलं तरी आज आम्ही तुम्हाला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत, ज्या देशात एकही ट्राफिक सिग्नल नाही. हा भारताच्याच बाजूचा देश आहे. तर जाणून घ्या या देशाबद्दल...
भूतान देशात नाही एकही ट्राफिक सिग्नल
आम्ही ज्या देशाबद्दल बोलतोय, त्या देशाचं नाव भूतान आहे. भूतान हा दक्षिण-पूर्व आशियातील पूर्व हिमालयात स्थित एक सुंदर देश आहे. भूतानला 'लँड ऑफ द थर्ड ड्रॅगन' म्हणूनही ओळखलं जातं. या देशाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्यातील एक गोष्ट तेथील रस्त्यांशी संबंधित आहे. येथील रस्त्यांवर एकही ट्राफिक सिग्नल नाही.
कशा चालतात गाड्या?
भूतानमध्ये ट्राफिक सिग्नल नसतात. भूतानमधील पर्वतरांगांमध्ये गाडी चालवणं एखाद्या साहसापेक्षा कमी नाही. गाई-म्हशींसारख्या प्राण्यांचे कळप तुम्हाला या देशातील रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना दिसतात. याशिवाय, येथील लोक रस्त्यातच थांबून एकमेकांना नमस्कार करतात. भूतानमध्ये वाहनांचा वेग खूप कमी ठेवला जातो आणि सावधता बाळगून गाडी चालवली जाते, त्यामुळे येथे ट्राफिक सिग्नलची गरज नसते.
इथे उद्भवत नाही वाहतूक कोंडीची समस्या
भूतानमध्ये ट्राफिक सिग्नल तर नसतात, पण इथे कधी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही हे देखील तितकंच खरं. येथील रस्ते अशा प्रकारे बांधण्यात आले आहेत की ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवणार नाही. या देशातील रस्त्यांवर तुम्हाला ट्राफिक पोलीस उभे असलेले दिसतील, जे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू देत नाहीत आणि या देशात वाहतूक कोंडी होत नाही.
देशात एकुलता एक कार्बनमुक्त देश
भूतान या देशात जितक्या प्रमाणात CO2 गॅसचं उत्पादन होतं, तितकंच ते नष्टही केलं जातं. परंतु येथील हिरव्यागार जंगलांमुळे कार्बन डायऑक्साईड गॅस शोषून घेतला जातो. भूतान देश हा कार्बन सिंकच्या रुपात काम करतो आणि अधिकाधिक कार्बन डायऑक्साईड गॅस नष्ट करतो. जास्त झाडांच्या संख्येमुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन येथील हवेत असतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :