एक्स्प्लोर
दूध पिताना गुदमरुन मृत्यू, शेरीनच्या वडिलांना बेड्या
घरातील गॅरेजमध्ये बापलेकीत दूध पिण्यावरुन धुसफूस झाली. चिमुरड्या शेरीनने दूध पिण्यास नकार दिल्यामुळे वेस्लेने तिला बळजबरीने दूध पाजलं. मात्र यात तिचा श्वास गुदमरला.
![दूध पिताना गुदमरुन मृत्यू, शेरीनच्या वडिलांना बेड्या Texas Father Admits To Force Giving Milk To 3 Year Old Sherin Until She Died Police Latest Update दूध पिताना गुदमरुन मृत्यू, शेरीनच्या वडिलांना बेड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/25043137/Sherin-Mathews-father-Wesley-TEXAS.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
टेक्सास : भारतातून दत्तक गेलेल्या तीन वर्षांच्या शेरीनच्या मृत्यूप्रकरणी तिच्या दत्तक वडिलांना अटक करण्यात आली आहे. दूध पिताना गुदमरुन मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह हलवल्याची कबुली वेस्ले मॅथ्यूजने दिली आहे.
शेरीनचा मृतदेह सापडल्यानंतर वेस्लेने पोलिसांना आधी सांगितलेली कथा फिरवली. मात्र शेरीनच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
7 ऑक्टोबरच्या सकाळी घरातील गॅरेजमध्ये बापलेकीत दूध पिण्यावरुन धुसफूस झाली. चिमुरड्या शेरीनने दूध पिण्यास नकार दिल्यामुळे वेस्लेने तिला बळजबरीने दूध पाजलं. मात्र यात तिचा श्वास गुदमरला.
भारतातून दत्तक गेलेली चिमुरडी शेरीन अमेरिकेत मृतावस्थेत?
'शेरीनला खोकला येऊ लागला. तिचा श्वास मंदावला. वेस्लेला तिच्या हाताची नाडीही जाणवत नव्हती. तिचा मृत्यू झाला, असा त्याचा समज झाला' असं वेस्लेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तीन वर्षांच्या लेकीच्या मृत्यूप्रकरणी वेस्ले मॅथ्यूजला सोमवारी अटक करण्यात आली. शेरीन बेपत्ता झाल्यानंतर वेस्लेच्या चार वर्षांच्या सख्ख्या मुलीलाही संगोपनगृह (फॉस्टर केअर)मध्ये ठेवण्यात आलं आहे. वेस्लेच्या पत्नीवर गुन्हेगारी ठपका ठेवण्यात आलेला नाही. शेरीन गायब झाली, त्यावेळी आपण झोपल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. लहान मुलाला गंभीर इजा केल्याप्रकरणी सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. वेस्लेचा बनाव शेरीन दूध पित नसल्यामुळे आपण तिला पहाटे तीन वाजता घराबाहेर झाडाखाली उभं राहण्यास सांगितलं. 15 मिनिटांनी तिला पाहण्यासाठी बाहेर आलं असता, ती कुठेच दिसली नाही, असा दावा वेस्लेने केला होता. ही घटना घडून पाच तास उलटल्यानंतरही त्याने शेरीन बेपत्ता असल्याची तक्रार दिली नसल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या होत्या. शेरीन कोण आहे? टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने 23 जून 2016 रोजी बिहारमधील नालंदात असलेल्या एका अनाथाश्रमातून दीड ते दोन वर्षांची चिमुरडी दत्तक घेतली होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी तिला ‘सरस्वती’ असं संबोधलं जायचं. वेस्ले मॅथ्यूज आणि सिनी यांनी तिचं नामकरण शेरीन असं केलं. या दाम्पत्याचं मूळ केरळमध्ये असल्याची माहिती आहे. वेस्ले मॅथ्यूज आणि सिनी यांना त्यांच्या एक वर्षाच्या मुलीसाठी भावंड हवं होतं. त्यामुळे त्यांनी सरस्वतीला दत्तक घेतलं. सरस्वतीच्या जन्मदात्या आई-वडिलांनी तिला गयामध्ये सोडलं होतं. त्यानंतर मदर तेरेसा अनंत सेवा संस्थानाकडून तिचा सांभाळ करण्यात आला. राहत्या घराजवळ जंगली कुत्रे फिरकत असल्याची जाणीव असूनही पालकांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार न नोंदवणं चिंताजनक असल्याचं कोर्टाने सांगितलं होतं. वेस्लेला 7 ऑक्टोबरच्या रात्री रिचर्डसन पोलिसांनी अटक केली. लहान मुलाच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा परिस्थितीत सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. अडीच लाख डॉलर्सचा बाँड दिल्यानंतर वेस्लेची सुटका करण्यात आली. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग डिव्हाईस घालण्याची सक्ती असून वेस्लेचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. शेरीन बेपत्ता असताना, गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्वीट करुन चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेतील भारतीय दूतावास यात लक्ष घालून असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)