महिला कलाकार असलेल्या कार्यक्रमावर बंदी, महिला पत्रकारांनीही हिजाब परिधान करणं बंधनकारक; तालिबान सरकारचे आदेश
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने देशातील सर्व टीव्ही चॅनेल्सना कार्यक्रम प्रसारित करण्याबाबत आदेश दिले आहेत.
Taliban New Rules: अफगाणीस्तानच्या तालिबान सरकारने देशातील सर्व टीव्ही चॅनेल्सना आदेश दिले आहेत. ज्या कार्यक्रमांमध्ये महिला दिसतील अशा प्रकारचे कार्यक्रम प्रसारित करू नये, असे आदेश तालिबान सरकारने दिले आहेत. तालिबान सरकारने आता नवीन मार्गदर्शक तत्तवे जाहीर केली आहेत. वृत्तवाहिन्यांमधील महिला पत्रकारांना आता वृत्त प्रसारित करताना हिजाब परिधान करणं गरजेचे असणार आहे.
काही दिवसांपूर्वी अफगाणीस्तानच्या माहिती प्रसारण विभागाने सांगितले होते,"देशात कार्यरत असलेल्या सर्व टीव्ही चॅनेलना त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल". 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवून संपूर्ण देशाचा ताबा घेतला. तेव्हापासूनच तालिबान सरकार अनेक निर्बंध लादत आले आहेत.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे
तालिबान सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. देशातील सर्व टीव्ही चॅनेल्सना त्यांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. यातील सर्वात महत्तवाचा नियम म्हणजे ज्या कार्यक्रमांमध्ये किंवा मालिकांमध्ये महिला नसतील तेच कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील. तर वृत्तवाहिन्यांमधील महिला पत्रकारांना आता वृत्त प्रसारित करताना हिजाब परिधान करणं गरजेचे असणार आहे. इस्लाम धर्मासंबंधी गोष्टीदेखील आता प्रसारित करता येणार नाहीत.
पुरुषांना दाढी करण्यास सक्त मनाई
तालिबानने अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतातील केशभूषाकारांना दाढी कापण्यास बंदी घातली आहे. कारण दाढी करणं हे इस्लामिक कायद्याच्या त्यांच्या व्याख्येचे उल्लंघन करते.
संबंधित बातम्या