Swiss Bank : स्विस बँकेत किती भारतीयांचे अकाउंट? याच महिन्यात केंद्र सरकारला मिळणार तिसरी यादी
Swiss Bank Indian Account Holders Details List : स्विस बँक भारतातील काळा पैसा खातेधारकांची माहिती लवकरच प्रसिद्ध करणार आहे.
Swiss Bank Indian Account Holders Details List : स्विस बँकेतील कुबेरांची तिसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. स्विस बँक भारतातील काळा पैसा खातेधारकांची माहिती या महिन्यात देणार असल्याची माहिती मिळत आहे. पहिल्यांदाच स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या मालमत्तेच्या स्थावर मालमत्तेची माहितीही दिली जाणार आहे. काळ्या पैशाविरोधातील लढ्यात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फोर्मेशन (AEOI) अंतर्गत ही माहिती देण्यात आली आगे. या सेटमध्ये पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकीच्या अचल संपत्तीचा तपशील असेल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत अनेक महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. जसं स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांचे किती फ्लॅट आणि अपार्टमेंट आहेत. त्यासोबतच अशा संपत्तीवर किती कर भरायचा आहे, यासंदर्भात माहिती समोर येईल.
स्विस बँकेच्या वतीनं भारताला तिसऱ्यांदा भारतीय खातेधारकांची माहिती देण्यात येईल. स्विस बँकेची तिसरी यादी म्हणजे, काळ्या धनाविरोधातील महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. पहिल्यांदाच स्विस बँक भारतीयांच्या स्थावर मालमत्तेची माहिती भारताला देणार आहे. तज्ज्ञांच्या वतीनंही स्विस बँकेनं घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फोर्मेशन (AEOI) अंतर्गत स्विस बँकेकडून भारताला सप्टेंबर 2019 मध्ये पहिली आणि सप्टेंबरमध्ये 2020 मध्ये दुसरी यादी मिळाली होती. स्वित्झर्लंड सरकारनं याच वर्षी परदेशी गुंतवणुकीची माहिती शेअर करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, डिजिटल चलनाचा तपशील शेअर करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रत्येक वेळी स्वित्झर्लंडनं जवळपास 30 लाख खातेधारकांची माहिती शेअर केली आहे. दरम्यान, यंदा या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :