Health Insurance Benefits : वयाच्या 30व्या वर्षापर्यंत घ्यावा आरोग्य विमा; काय आहेत कारणं अन् फायदे?
Health Insurance Benefits : कोरोनामुळं आपल्या सर्वांचंच आयुष्य पूरतं बदललं आहे. अशातच सध्या आरोग्य विम्याबाबत काहीना काही माहिती समोर येत आहे. पण आरोग्य विमा घेणं का फायदेशीर ठरतं? जाणून घेऊया...
Health Insurance Benefits : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आपल्या सर्वांचंच आयुष्य बदललं आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून हेल्थ इंशोरन्स म्हणजेच, आरोग्य विम्यासंदर्भात अनेक गोष्टी, माहिती आपल्यासमोर येत असते. आरोग्य विमा (Health Insurance) आपल्या आजारपणात उपचाऱ्यांदरम्यान होणाऱ्या खर्चासाठी उपयोगी ठरतो. साधारणतः बऱ्याचदा तज्ज्ञ आपल्याला लवकरात लवकर आरोग्य विमा घेण्याचा सल्ला देतात. त्यामागे अनेकजण एकच कारण देतात की, आरोग्याच्या तक्रारी किंवा समस्यांचा सामना कधीही करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला आरोग्य विम्याबाबत काही माहिती सांगणार आहोत. अनेत तज्ज्ञांच्या मते, वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत आरोग्य विमा घेणं फायदेशीर ठरतं.
कमी किमतीचा प्रीमियम
वयाच्या 30व्या वर्षी विमा घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रीमियमची कमी किंमत. अनेत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विम्याचा प्रीमियम हा विमा घेणाऱ्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतो. यावरुन स्पष्ट होतं की, 40 वर्षांच्या व्यक्तीच्या तुलनेत 30व्या वर्षी विमा घेणाऱ्या व्यक्तीला प्रीमियम कमी भरावा लागतो.
आर्थिक सुरक्षा
आरोग्य विम्याचे अनेक फायदे आहेत. रुग्णालयात दाखल होण्यासाठी जे शुल्क लागते ते माफ होतेच. त्यासोबतच आरोग्य विमा असल्यामुळं रुग्णालयाचा कोणत्याही खर्च भरावा लागत नाही. आरोग्याशी संबंधित खर्चाची चिंता न करता तुम्ही तुमचे पैसे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकता.
अकाली आजारांपासून संरक्षण
आपल्यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारच्या आजाराला बळी पडू शकते. जसं की, मधुमेह, हृदयाच्या समस्यांसारखे अनेक रोग जे माणसाला कधीही, कोणत्याही वयात जडू शकतात. या आजारांच्या उपचारात आपल्याला आरोग्य विमा फायदेशीर ठरतो.
टॅक्स (कर) यापासून सुटका
आयकर कायद्याच्या कलम 80 डी नुसार, आरोग्य विमा योजनांसाठी भरलेल्या प्रीमियमसाठी करमुक्तीचा दावा केला जाऊ शकतो. म्हणूनच लहान वयात विमा पॉलिसी खरेदी केल्याने एखाद्या व्यक्तीला नंतरच्या कालावधीसाठी जास्त वेळ प्रतीक्षा टाळण्यास आणि त्याचा लाभ घेण्यास मदत होते.