Sri Lanka Protests Timeline : जनतेच्या विरोधानंतर श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा राजीनामा, नक्की काय घडलं? घटनाक्रम जाणून घ्या...
Sri Lanka Economic Crisis : श्रीलंका इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात आहे. जीवनावश्क वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याने जनता रस्तावर उतरली आहे.
Sri Lanka Economic Crisis : भारताचा शेजारील देश श्रीलंका 1948 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याचा परिणाम जनतेवर आणि देशाच्या राजकारणावरही होत आबहे. श्रीलंकेत परकीय चलनांचा तुटवडा आहे. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी त्रस्त जनतेकडून रस्त्यावर उतरुन निदर्शनं करण्यात येत आहेत. विदेशी चलनांचा तुटवडा असल्याने इतर देशांमधून वस्तू आयात करणंही श्रीलंकेला शक्य नाही.
जनतेनं विरोध केल्याने श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी शनिवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 'सर्व नागरिकांच्या सुरक्षेसह सर्वपक्षीय सरकारचा मार्ग तयार करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची शिफारस मी आज स्वीकारतो आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देतो.' असे ट्विट रानिल विक्रमसिघे यांनी केलं.
घटनाक्रम जाणून घ्या...
31 मार्च, 2022 : पंतप्रधानांच्या घरावर मोर्चा
देशातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे जनतेनं पंतप्रधान राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला.
3 एप्रिल 2022 : राजपक्षे यांचं मंत्रिमंडळ बरखास्त
राजपक्षे यांनी मंत्रिमंडळ बरखास्त केलं. यामध्ये त्यांचा लहान भाऊ यांचा वित्तमंत्री म्हणून समावेश होतो. मात्र यानंतरही त्यांचा मोठा भाऊ महिंदा राजपक्षे पंतप्रधान पदावर कायम होते.
9 एप्रिल 2022 : सरकारविरोधातील जोरदार निदर्शनं
पंतप्रधान राजपक्षे यांनी पदावर पायउतार होण्यासाठी जोरदार निदर्शनं सुरु झाली. जनतेकडून राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली.
9 मे 2022 : महिंदा राजपक्षे यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा
सरकारविरोधातील जोरदार निदर्शनाला हिंसक वळण लागलं. यामध्ये नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. जोरदार विरोधानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला.
9 जुलै 2022 : घटनाक्रम
- हजारोंच्या संख्येने आंदोलक राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसले. जनतेचा विरोध पाहता राष्ट्रपतींनी शुक्रवारीच निवासस्थान सोडले होते.
- आंदोलकांनी पंतप्रधानांच्या घराला आग लावली.
- पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्यासही तयार असल्याचं सांगितलं.
- राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांना सांगितले की, राजीनाम देत असल्याचे सांगत 13 जुलै रोजी पद सोडण्याची घोषणा केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- SriLanka Crisis : श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचा राजीनामा, ट्विट करून दिली माहिती
- Sri Lanka protest : आंदोलक आक्रमक, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचेल खासगी घर पेटवले
- Sri Lanka Crisis: श्रीलंकेत पुन्हा मोठा गोंधळ, अंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेरलं; राष्ट्रपती राजपक्षेंचं पलायन